रशिया करणार उद्या पहाटे युक्रेनवर हल्ला, अमेरिकच्या संरक्षण सूत्रांचा दावा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे पहाटे तीन वाजता हल्ल्याची अधिकृत घोषणा करतील, असा दावाही अमेरिकेने केला आहे. भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्याचे आवाहन
Russia Ukraine War
Russia Ukraine WarDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेच्या संरक्षण सूत्रांनी केला आहे की, उद्या सकाळी 5.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) रशिया आपल्या सैन्यासह युक्रेनवर हल्ला करणार आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे पहाटे तीन वाजता हल्ल्याची अधिकृत घोषणा करतील, असा दावाही अमेरिकेने केला आहे.

Russia Ukraine War
Rolls Royce कंपनी लॉंच करणार इलेक्ट्रिक विमान

माध्यमांच्या वृत्तानुसार, बुधवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 3 वाजता व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या घोषणेनंतर रशियन सैन्य पहाटे 5:30 वाजता युक्रेनवर अनेक आघाड्यांवर आक्रमण करणार आहे. भारतीय वेळेनुसार आज रात्री साडेबारा वाजता युद्धाची घोषणा होईल. तर रात्री 2.30 वाजता रशिया युक्रेनच्या काही भागांवर हल्ला करेल. द मिरर यांच्या म्हणण्यानुसार रशियन सैन्यासह युद्ध टँक सीमा ओलांडण्यापूर्वी कीवच्या लष्करी आणि सरकारी कमांड आणि नियंत्रण केंद्रांवर हवाई हल्ले करतील. अमेरिकन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाचा पहिला प्रयत्न राजधानी कीववर कब्जा करण्याचा असेल.

अमेरिकेच्या एका वरिष्ठ सूत्राने द मिररला सांगितले की, रशिया युक्रेनच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर एकाच वेळी हल्ला करण्यासाठी आपल्या लष्करी सैन्याचा वापर करू शकतो. त्यांनी एका ओळीतच इशारा दिला – बुधवारी पहाटे तीन वाजता. रशियाचे युक्रेनच्या (Ukraine) पूर्व सीमेवर 1,26,000 हून अधिक सैन्य आहे तर उत्तरेकडील बेलारूसमध्ये 80,000 आहेत.

सैनिकांच्या घरवापसीची घोषणा

रशियाने (Russia) मंगळवारी आधी सांगितले की, लष्करी सरावात भाग घेणारे काही सैनिक त्यांच्या लष्करी तळांवर परत जातील. रशियाने माघारीचा तपशील दिला नसला तरी युक्रेनवर हल्ला करण्याची रशियाची योजना नसावी अशी आशा निर्माण झाली आहे.

रशियाला अमेरिकेचा धोका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी पुन्हा एकदा रशियाला इशारा दिला आहे ते म्हणाले की, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास त्याचे भयंकर परिणाम त्यांना भोगावे लागतील. रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ सुमारे 1,00,000 सैन्य जमा केले आहे. या हालचालीवर पाश्चात्य देश त्याला इशारा देत आहेत आणि युक्रेनवर हल्ला करण्याचा त्याचा इरादा असल्याचा आरोप करत आहेत. मात्र, रशियाने युक्रेनवर असा हल्ला करण्याचा कोणताही विचार नसल्याचं वारंवार सांगितल आहे.

भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्याचे आवाहन

युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीची अनिश्चितता लक्षात घेता, भारतीय नागरिक, विशेषत: ज्या विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये राहण्याची आवश्यकता नाही, ते तात्पुरते सोडण्याचा विचार करू शकतात, असे युक्रेनची राजधानी कीव येथील भारतीय (India) दूतावासाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारतीय नागरिकांना युक्रेनमध्ये आणि अंतर्गत सर्व अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com