रशिया युक्रेन युद्ध सुमारे 120 दिवस सुरु आहे. यामध्ये दोन्ही देशांची मोठी हाणी झाली आहे. तरी ही दोन्ही राष्ट्रे मागे हटण्यास तयार नाहीत. रशियाने हल्ला करणे सुरुच ठेवले आहे. तर युक्रेनने हा हल्ला परतवणे सुरुच ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारतासह 5 देशांमध्ये नियुक्त केलेल्या राजदूतांना हटवले आहे. यामध्ये त्यांनी जर्मनी, भारत, झेक प्रजासत्ताक, नॉर्वे आणि हंगेरीमधील युक्रेनच्या राजदूतांना बडतर्फ केल्याची घोषणा केली. ( Russia ukraine war ; zelensky say war with russia sacked his ambassadors from 5 countries )
या राजदूतांना इतरत्र तैनात केले जाईल की नाही, हेही आदेशात स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्याच वेळी, अध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपल्या आदेशात मुत्सद्दींना आंतरराष्ट्रीय समर्थन आणि लष्करी मदत एकत्रित करण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनने हा निर्णय घेण्यामागचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही. तसेच आपला आक्रमकपणा न सोडता आपली भुमिका ही ताठरच ठेवली आहे. त्यामूळे युक्रेन आपल्या निर्णयावर किती ठाम आहे. याचा ही प्रत्यय आला आहे.
दुसरीकडे रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. युक्रेनच्या पूर्वेकडील औद्योगिक प्रांत लुहान्स्कमधील हल्ले तात्पुरते थांबवल्याच्या वृत्तांदरम्यान, स्थानिक गव्हर्नरने रशियन सैन्यावर या क्षेत्राला नरकात बदलल्याचा आरोप केला. युक्रेन सरकारने रशियन-नियंत्रित प्रदेशातील रहिवाशांना हल्ल्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत क्षेत्र सोडण्याचे आवाहन केले आहे.
युक्रेनच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील भागात बॉम्बस्फोट
रशियानेही युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात जोरदार बॉम्बफेक केली आहे. रशियन सैन्याने रात्री प्रांतात 20 हून अधिक मोर्टार आणि रॉकेट गोळीबार केला आणि त्याचे सैन्य डोनेस्तक सीमेवर प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, युक्रेनच्या उपपंतप्रधान इरिना व्ही. यांनी रशियन-व्याप्त देशाच्या दक्षिणेकडील भागात राहणाऱ्या लोकांना शक्य तितक्या लवकर ते क्षेत्र सोडण्याचे आवाहन केले, जेणेकरून युक्रेनवर हल्ला झाल्यास रशियन सैन्याचा ढाल म्हणून वापर करता येईल. त्यांचा वापर करू नका.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.