Pope Francis Ukraine War: युद्धग्रस्त युक्रेनबद्दल बोलताना पोप फ्रान्सिस भावूक, पाहा व्हिडिओ

पोप फ्रान्सिसला भावूक झाल्याचे पाहून लोकांनी टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले.
Pope Francis Ukraine War
Pope Francis Ukraine WarDainik Gomantak

रशिया-युक्रेन युद्ध 10 महिन्यांनंतरही थांबलेले नाही. या युद्धात हजारो लोक मरण पावले, तर दुसरीकडे लाखो लोक बेघर झाले. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. दरम्यान, युक्रेनमधील परिस्थितीबद्दल बोलताना पोप फ्रान्सिस भावूक आणि रडताना दिसले. 

खरं तर, पोपने मध्य रोममधील स्पॅनिश स्टेप्सजवळ प्रार्थना सेवेला हजेरी लावली जिथे त्यांनी युक्रेन आणि युद्धाबद्दल बोलले आणि ते भावूक झाले. डेलीमेलच्या बातमीनुसार, ते बोलत असताना त्यांचा आवाज थरथरू लागला आणि उपस्थित लोकांना ते भावूक झाल्याचे समजले. 

पोप इतके भावूक झाल्याचे पाहून लोकांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले आणि भाषण पूर्ण करण्यास सांगितले. पोप सुमारे 30 सेकंद शांत राहिले आणि नंतर युक्रेनियन लोकांसाठी प्रार्थना करून त्यांचे भाषण संपवले. त्याचवेळी, वृत्तानुसार, यावेळी पोप म्हणाले की, युक्रेनमधील युद्ध खूप वेदनादायक आहे. हा मानवतेचा मोठा पराभव आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com