रशिया-युक्रेन युद्ध 'सायलेंट' मोडवर

रशियाने नागरी लोकांच्या स्थलांतरासाठी बुधवारी सकाळी युक्रेनमध्ये मानवतावादी युद्धविराम जाहीर केला.
Humanitarian Armistice
Humanitarian ArmisticeDainik Gomantak
Published on
Updated on

रशियाने (Russia) नागरी लोकसंख्येच्या स्थलांतरासाठी बुधवारी सकाळी युक्रेनमध्ये (Ukraine) मानवतावादी युद्धविराम जाहीर केला, असे मीडिया अहवालात म्हटले गेले आहे. (Humanitarian Armistice)

Humanitarian Armistice
युपीच्या एक्झिट पोलवर पाकिस्तानी मीडियाचीही नजर

रशियाने "शांतता" घोषित केली आहे आणि कीवसह अनेक शहरांमधून मानवतावादी कॉरिडॉर प्रदान करण्यास सुरुवात केली आहे, असे स्पुतनिक वृत्तसंस्थेने सांगितले आहे. दोन्ही बाजूंनी मानवतावादी कॉरिडॉरमध्ये व्यत्यय आणल्याबद्दल एकमेकांवर आरोप केल्यामुळे ही घोषणा करण्यात आली आहे. रशियाने सांगितले की ते चेर्निहाइव्ह, सुमी, खार्किव, मारियुपोल आणि झापोरिझ्झिया येथून कॉरिडॉर देण्यास तयार झाले आहेत.

मानवतावादी समन्वय केंद्राचे प्रमुख मिखाईल मिझिनत्सेव्ह म्हणाले की, रशियाने पुन्हा एकदा युक्रेनला नागरिकांच्या माघारीच्या मार्गांवरती सहमती देण्याची ऑफर दिली आहे.

"उक्त विधान ताबडतोब युक्रेनियन बाजूच्या लक्षात आणून दिले पाहिजे आणि 9 मार्च 2022 रोजी 3 पर्यंत सूचित मार्ग आणि मानवतावादी कॉरिडॉरच्या प्रारंभाच्या वेळेवरती सहमती देण्यासाठी प्रस्तावित करायला पाहिजे. सुरक्षेची हमी देण्यासह या दृष्टिकोनांचीही लेखी मंजूरी सबमिट करा," असे मिझिंतसेव्ह म्हणाले.

यापूर्वी मंगळवारी, विशेषत: सुमी शहरातून नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. शिवाय, राजधानी कीवच्या बाहेरही स्थलांतरण झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com