Russia-Pakistan: अनेकदा धोका खाऊनही भारताचा मित्र पुन्हा पाकिस्तानच्या मदतीला

Russia-Pakistan: भारताचा मित्र रशियाने प्रथम पाकिस्तानला स्वस्त तेल दिले आणि नंतर पाकिस्तानमध्ये जेव्हा अन्नटंचाई निर्माण झाली होती तेव्हा रशियामे गहू निर्यात केला होता.
Russia-Pakistan
Russia-PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

Russia-Pakistan: युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून पाकिस्तान सातत्याने रशियाचा विश्वासघात करत आहे. पाकिस्तानने युक्रेनच्या लष्कराला क्षेपणास्त्रांपासून तोफगोळ्यांपर्यंत सर्व काही पुरवले आहे. या बदल्यात पाकिस्तानी लष्कराने नाटो देशांकडून करोडो डॉलर्स कमावले आहेत.

पाकिस्तानने वारंवार विश्वासघात करूनही रशियाला मदत करण्याची इच्छा आहे. भारताचा मित्र रशियाने प्रथम पाकिस्तानला स्वस्त तेल दिले आणि नंतर पाकिस्तानमध्ये जेव्हा अन्नटंचाई निर्माण झाली होती तेव्हा रशियामे गहू निर्यात केला होता. आता रशियाला पाकिस्तानच्या सहकार्याने दहशतवादाविरोधात मोहीम राबवायची आहे.

पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि रशियाने शुक्रवारी कट्टरतावाद, दहशतवादी विचारसरणीचा प्रसार आणि दहशतवाद्यांकडून माहिती आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर यावर विस्तृत चर्चा केली.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्वसमावेशक रणनीती तयार करण्याच्या गरजेवर पाकिस्तान आणि रशिया या दोघांनी सहमती दर्शवली. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी रशिया आणि पाकिस्तान यांच्यातील ही 10वी बैठक होती.

रशियाने पाकिस्तानला मदतीची ही घोषणा अशा वेळी केली आहे जेव्हा पाकिस्तानचे सैन्य TTP ( Tehrik-i-Taliban Pakistan )च्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याने त्रस्त आहेत. तालिबानच्या दहशतवाद्यांनी आतापर्यंत शेकडो पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आहे.

अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार आल्यापासून टीटीपीचे हल्ले आणखी वाढले असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. आता पाकिस्तानला रशियाच्या मदतीने तालिबानवर दबाव आणायचा आहे जेणेकरून ते टीटीपीवर कारवाई करू शकतील. वास्तविक, पाकिस्तान आता तालिबानकडून हल्ल्याच्या धमक्या देत आहे पण त्याचा काहीही परिणाम झालेला नाही.

Russia-Pakistan
China-Australia: चीनच्या आठमुठेपणामुळे ऑस्ट्रेलियाचे नौसेनिक झाले जखमी

टीटीपी दहशतवाद्यांना पाकिस्तानचे सध्याचे सरकार पाडायचे आहे आणि त्यामुळे पाकिस्तान सरकार घाबरले आहे. त्यामुळेच ते तालिबानला संपवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत आहेत. पाकिस्तानने आता या संपूर्ण प्रकरणात रशियाला सहभागी करून घेत अफगाणिस्तान आणि टीटीपीमधील परिस्थितीवर चर्चा केली आहे.

पाकिस्तानला आता रशियाच्या माध्यमातून आपले हित साधायचे आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने पाकिस्तानसमोर गुडघे टेकण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आता पाकिस्तान-रशियाच्या एकत्र कारवायांचा काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पाकिस्तानला दहशतवाद्यांचे घर म्हटले जाते. अनेकदा पाकिस्तानकडून भारतावर सीमेपार दहशतवादाच्या कारवाया करत अस्थिरता निर्माण केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्येदेखील अनेकदा दहशतवादाच्या कारवाया पाकिस्तानकडून करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com