President of Russia Vladimir Putin
President of Russia Vladimir PutinDainik Gomantak

रशियाने अमेरीकेला दिली युद्धाची धमकी

नेव्ही डेच्या दिवशी सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या समारंभात पुतीन म्हणाले की, आम्ही पाण्याच्या आतल्या, पाण्यावरच्या आणि हवेत उडणा शत्रूंना ओळखण्यास आणि योग्य उत्तर देण्यास सक्षम आहोत.
Published on

रशियाचे अध्यक्ष (President of Russia) व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी, रशियाचे नौदल शत्रूंच्या "हल्ला करण्यास" तयार असल्याचे म्हणत आक्रमक भुमिका घेतली आहे. विशेष म्हणजे क्रिमियाच्या मुद्द्यावरुन अमेरिका आणि ब्रिटन यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष पुतीन यांनी हे विधान केले आहे. रशियाने 2014 मध्ये जबरदस्तीने क्रिमियाला युक्रेनपासून वेगळे केले, परंतु अजूनही जगातील बहुतेक लोक क्रिमियाला युक्रेनचा भाग मानतात. अमेरिका आणि ब्रिटन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आपल्या अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा एस -500 आणि झिरकॉन हायपरसोनिक क्षेपणास्त्राची (Hypersonic Zircon Missile) चाचणी सुद्दा नुकतीच घेतली आहे. (Russia has threatened the United States with war)

गरज पडल्यास आक्रमण करण्यास तयार रशियन सैन्य

नेव्ही डेच्या दिवशी सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या समारंभात रशियाचे अध्यक्ष पुतीन म्हणाले की, आम्ही पाण्याच्या आतल्या, पाण्यावरच्या आणि हवेत उडणा शत्रूंना ओळखण्यास आणि शत्रुला योग्य उत्तर देण्यास सक्षम आहोत. तसेच गरज पडल्यास आम्ही हल्ला देखील करू शकतो असे म्हणत राष्ट्रपतींनी रशियाची नवीन शस्त्रे अजिंक्य असल्याचे म्हटले आहे. अलीकडेच, रशियाने ब्रिटनची युद्धनौका क्रिमिनियन द्वीपकल्पाजवळ पाठवल्यानंतर आपली लढाऊ विमाने पाठविली. यामुळे या दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

President of Russia Vladimir Putin
तालिबान आणि अफगाणी सैन्यातील लढाईत भरडली जातेय सामान्य जनता- UN रिपोर्ट

रशियाने ब्रिटीश युद्धनौकेजवळ बॉंम्बचा पाऊस पाडला होता. यावर पुतीन म्हणाले की, आम्ही ती युद्धनौका बुडवून टाकू शकत होता. जे अवैध्यरित्या आमच्या हद्दीत आले होते. त्यामुले अमेरीकाच हा तणाव वाढायला कारणीभुत असल्याचा आरोप पुतीन यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com