British Prime Minister Boris Johnson
British Prime Minister Boris JohnsonDainik Gomantak

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रशियात 'नो एन्ट्री'

रशियाने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (British Prime Minister Boris Johnson) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या देशात येण्यास बंदी घातली आहे.
Published on

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दोन ते तीन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. यातच आता रशियाने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या देशात येण्यास बंदी घातली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. रशियाने (Russia) म्हटले आहे की, ''आम्ही ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson), परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस आणि इतर अनेक कॅबिनेट मंत्र्यांना देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. युक्रेनविरुद्ध (Ukraine) युद्ध सुरु झाल्यानंतर मॉस्कोला एकाकी पाडण्यासाठी ब्रिटनने लादलेल्या निर्बंधांना प्रतिसाद म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे.'' (Russia has banned British Prime Minister Boris Johnson from entering the country)

British Prime Minister Boris Johnson
"तिसरे महायुद्ध झाले सुरु", मॉस्क्वा युद्धनौका बुडाल्यानंतर करण्यात आली घोषणा

दरम्यान, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने 16 एप्रिल रोजी एका निवेदनात म्हटले आहे की, ''अमेरिका, युरोपियन युनियन आणि इतर मित्र देशांच्या समन्वयाने लादलेले निर्बंध देशांतर्गत अर्थव्यवस्थेला मोठा धक्का देत आहेत. माजी पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासह एकूण 13 ब्रिटिश अधिकाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे.'' यासोबतच ही यादी आगामी काळात वाढवली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर झालेल्या हल्ल्यानंतर रशियावर निर्बंधांचा वर्षाव होत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, त्यांचे कुटुंब आणि रशियन अधिकाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय रशियन कंपन्या आणि ऑलिगार्कवरही बंदी घालण्यात आली आहे.

कीवमध्ये स्फोट झाले

दरम्यान, युक्रेनच्या राजधानी कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी एका ऑनलाइन पोस्टमध्ये सांगितले की, ''राजधानीच्या पूर्वकडील जिल्हा डार्निटस्की, शनिवारी युद्धाने वेढला गेला आणि तिथे आणखी स्फोट झाले. बचाव कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. पीडितांची माहिती नंतर दिली जाईल.'' क्लिट्स्को यांनी रहिवाशांना सायरनच्या आवाजाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. ज्यांनी राजधानी सोडली होती त्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव परत येऊ नये. कीवच्या पूर्वेकडील भागात नीप्रो नदीकाठी धुराचे लोट दिसून आले आहेत.

British Prime Minister Boris Johnson
भारताला S-400 क्षेपणास्त्र प्रणाली देण्यास रशियाने केली सुरुवात

अलेक्झांड्रिया हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला

रशियन सैन्याने शुक्रवारी संध्याकाळी युक्रेनच्या किरोवोह्राद भागातील अलेक्झांड्रिया शहरातील हवाई तळावर क्षेपणास्त्रे डागली. शहराचे महापौर सेरही कुझमेन्को यांनी शनिवारी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. मात्र, या हल्ल्यात किती जीवित आणि वित्तहानी झाली याबाबत त्यांनी काहीही सांगितलेले नाही. प्रांताचे राज्यपाल, सेरही हैदाई यांनी सांगितले की, पूर्व लुहान्स्क प्रदेशात रात्रभर झालेल्या गोळीबारात एक ठार आणि तीन जण जखमी झाले आहेत. ते म्हणाले पुढे की, 'गोळीबारामुळे सेव्हरडोनेत्स्क आणि लिसिचांस्क शहराकडे जाणाऱ्या गॅस पाइपलाइनचेही नुकसान झाले.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com