Ritual Mass Murder: सामूहिक हत्याकांडाच्या भीतीने पोलीस घटनास्थळी धावले, पण सत्य समोल आलं तेव्हा...

Ritual Mass Murder: दुसऱ्या बॅचमध्ये असलेल्या काही लोक लवकर येत होते. तेव्हा सामूहिक हत्याकांडाच्या भीतीने पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
Rritual Mass Murder Turns Out To Be A Yoga Class
Rritual Mass Murder Turns Out To Be A Yoga Class Dainik Gomantak

Rritual Mass Murder Turns Out To Be A Yoga Class In Englands Lincolnshire: सामूहिक हत्याकांडाच्या भीतीने पोलिसांनी बुधवारी रात्री लिंकनशायर शहरातील कॅफेकडे धाव घेतली पण तिथे पोहल्यानंतर लोक योगा क्लासमध्ये 'शवासन' करत असल्याचे समोर आले.

चॅपल सेंट लिओनार्ड्स मधील नॉर्थ सी ऑब्झर्व्हेटरीमध्ये योगा क्लासेस आयोजित करणार्‍या सीस्केप कॅफेने लोकांना आवाहन केले की, आम्ही येथे कोणताही गैरप्रकार करत नाही त्यामुळे सर्वांनी निश्चिंत राहावे.

कॅफेने शेअर केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, "आधीपासून सुरू असलेल्या क्लासमध्ये लोक शवासन करत होते. दुसऱ्या बॅचमध्ये असलेल्या काही लोक लवकर येत होते. तेव्हा चुकून येथे सामूहिक हत्याकांड झाल्याचा त्यांचा समज झाला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. यातून हा प्रकार घडला."

Rritual Mass Murder Turns Out To Be A Yoga Class
"स्त्रीच्या प्रतिष्ठेपेक्षा मोठं काहीच नाही"; 12 वर्षांच्या मुलीला गर्भपातासाठी हायकोर्टाची परवानगी, नराधम बापाने केला होता बलात्कार

योगा प्रशिक्षकाने बीबीसी न्यूजला सांगितले, "मला वाटते की, बाहेरून पाहिल्यास कोणाचाही आतमध्ये हत्याकांड झाल्याचा समज झाला असता. कारण कारण योगा करणारे सर्वजन खरोखर शांत, खूप छान आणि आरामशीरपणे शवासन करत होते."

Rritual Mass Murder Turns Out To Be A Yoga Class
दमदार कंटेंटमधून 'हे' भारतीय YouTubers कमावतात करोडो रुपये

लिंकनशायर पोलिसांनी सांगितले, "काल रात्री 8.56 वाजता आम्हाला एका फोनद्वारे माहिती मिळाली की, सीस्केप कॅफेमध्ये योगा क्लासमध्ये सामूहिक हत्याकांड घडले आहे

त्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली असता तेथे लोक योगा क्लासमध्ये शवासन करत होते. हे सर्वजन सुरक्षित असल्याचे लक्षात येता आम्हाला आनंद झाला."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com