China: घटत्या लोकसंख्येपासून चीनला दिलासा! 9 वर्षानंतर मोडला रेकॉर्ड

China: चीनमध्ये जन्मदर घसरत आहे आणि समाज वेगाने वृद्ध होत आहे.
China's
China'sCNN

Relief from China's declining population

चीन हा सातत्याने आपल्या महात्वाकांक्षी योजनांमुळे सतत चर्चेत असतो. याबरोबरच, चीन आपल्या घटत्या लोकसंख्येमुळेदेखील त्रस्त असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता असा एक अहवाल समोर आला आहे, ज्यातून चीनला आता दिलासा मिळाला आहे.

समोर आलेल्या अहवालानुसार, जवळपास दशकभरानंतर चीनमध्ये लग्न करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये चीनमध्ये नवीन विवाहांची संख्या 12.4 टक्क्यांनी वाढेल. जवळपास दशकभराच्या घसरणीनंतर वाढलेली संख्या पाहायला मिळत आहे. कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आलेले लग्न हे 2023 मध्ये झाल्याने देखील या आकड्यांमध्ये वाढ झाल्याचा अंदाज लावला जात आहे.

चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी नवविवाहित जोडप्यांची संख्या 70 लाख 68 हजार झाली. 2022 च्या तुलनेत हे प्रमाण 8,45,000 अधिक आहे. तथापि, 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 2013 च्या 1 कोटी 30 लाखांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकार "जन्म-अनुकूल समाजाच्या दिशेने काम करेल आणि दीर्घकालीन, संतुलित लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन देईल", तसेच बाळाचा जन्म, संगोपन आणि शिक्षण यासाठी होणारा खर्च कमी करेल.

घटती लोकसंख्या कशी थांबवायची यासाठी चीनचे धोरणकर्ते सतत धडपडत असतात. चीनमध्ये जन्मदर घसरत आहे आणि समाज वेगाने वृद्ध होत आहे. पुढील दशकात जवळपास 300 दशलक्ष चिनी लोक निवृत्त होतील आणि नोकरीपासून दूर होतील. ही संख्या अमेरिकन लोकसंख्येच्या जवळपास आहे, अशी माहिती चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com