Red Wine River: रेड वाइनचा महापूर पाहिला का? पाहा व्हिडिओ

Red Wine: रेड वाईनचा महापूर आल्याचे दिसून आले आहे.
Red Wine
Red WineDainik Gomantak

Red Wine: आपण कित्येकदा नद्यांना आलेले महापूर पाहिले आहेत, त्याविषयी बऱ्याचदा ऐकलेही असतील . मात्र आता पोर्तुगालच्या एका छोट्या शहरात रेड वाईनचा महापूर आल्याचे दिसून आले आहे.

हे कसे शक्य आहे असा प्रश्न अनेकांना पडला असणार, चला तर जाणून घेऊयात नेमके प्रकरण काय आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, साओ लोरॅन्सो दे बारिओ ( Sao Lorenco de Bairro ) या गावात ही घटना घडली आहे. तब्बल दोन मिलियन लिटरचे टँक अचानक फुटल्याने हे दृश्य पाहायला मिळाले आहे.

ही रेड वाइनची नदी संपूर्ण गावभर पसरली असून लोकांचे नुकसान झाले आहे. काहींच्या घरात ही रेड वाइन गेली असून त्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. पुलामध्येदेखील ही वाइन साठून राहिली आहे.

जवळच असलेल्या नदीला हा रेड वाइनची नदी जाऊन मिसळले तर त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होईल अशी काळजी व्यक्त केली जात आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अग्नीशामक दलाने तात्काळ पाऊले उचलत क्रेटिमा नदीमध्ये हा रेड वाइनचा पूर मिसळण्याआधी त्याची दिशा बदलली आहे.

Red Wine
V K Singh ON POK: 'थोडं थांबा, पीओके आपोआप भारतात सामील होणार...;' केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग यांचे वक्तव्य

ज्या वाइन कंपनीचे टँक फुटून ही घटना घडली आहे त्या लेव्हीरा कंपनीने या प्रकरणाची जबाबदारी घेत माफी मागितली आहे. त्याबरोबरच गाव संपूर्ण स्वच्छ करत झालेल्या नुकसानाची भरपाई दिली जाईल असेही त्यांनी आपल्या माफीपत्रात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com