Saudi Arabia पहिल्यांदाच अंतराळात पाठवणार महिला अंतराळवीर, जाणून घ्या कोण आहे रायनाह बर्नावी?

Rayyanah Barnawi: सौदी अरेबिया पहिल्यांदाच महिला अंतराळवीराला अंतराळात पाठवणार आहे.
Rayyanah Barnawi
Rayyanah BarnawiDainik Gomantak
Published on
Updated on

Rayyanah Barnawi: सौदी अरेबिया पहिल्यांदाच महिला अंतराळवीराला अंतराळात पाठवणार आहे. हा विक्रम ज्या महिला अंतराळवीराच्या नावावर होणार आहे, तिचे नाव रायनाह बर्नावी आहे. त्यांच्यासोबत आणखी तीन अंतराळवीर कमांडर प्रेगी व्हिटसन, पायलट जॉन शॉफनर आणि मिशन स्पेशालिस्ट अली अल्कर्णी असतील.

दरम्यान, AX-2 असे या मोहिमेचे नाव असून ते 8 मे रोजी अमेरिकेच्या (America) फ्लोरिडा राज्यातून प्रक्षेपित होणार आहे. चार अंतराळवीर स्पेस स्टेशनवर 20 प्रयोग करणार आहेत. AX मिशन 1 नंतर 13 महिन्यांनी AX मिशन 2 होत आहे.

ड्रॅगन कॅप्सूल नासा केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले जाईल. हे लोक अंतराळ केंद्रात 10 दिवस घालवतील.

Rayyanah Barnawi
Saudi Arabia: रमजानच्या महिन्यात दशकानंतर सौदी अरेबियाने जगाला आश्चर्यात टाकणारे केले काम

रायनाह बर्नावी या मिशन तज्ञ म्हणून काम करतील

रायनाह बर्नावी Axiom Mission 2 (X-2) वर मिशन तज्ञ म्हणून काम करतील. सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) हे पाऊल आपल्या पुराणमतवादी विचारसरणीला संपवणारे आणि प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणारे म्हणून पाहिले जात आहे.

कोण आहे रायनाह बर्नावी

रायनाह बर्नावी महिला अंतराळवीर म्हणून सौदी अरेबियातील अंतराळ स्थानकावर जाण्याच्या तयारीत आहे. त्या ब्रेस्ट कॅन्सर तज्ज्ञ आहेत. कर्करोगाच्या स्टेम सेलच्या क्षेत्रात त्यांनी 9 वर्षे काम केले आहे. रायनाह बर्नावी यांनी न्यूझीलंडच्या ओटागो विद्यापीठातून बायोमेडिकल सायन्सेसमध्ये पदवी प्राप्त केली. त्यांनी सौदी अरेबियातून बायोमेडिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

Rayyanah Barnawi
Saudi Arabia अन् भारताची गुप्तचर संस्था RAW यांच्यात मोठी डील, पाकिस्तान तणावात

सौदीचे क्राउन प्रिन्स हे पहिले मुस्लिम अंतराळवीर होते

अंतराळ मोहिमेवर जाणारा पहिला मुस्लिम अंतराळवीर म्हणून विक्रम सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स सुलतान बिन अब्दुल अझीझ यांच्या नावावर आहे. 1985 मध्ये ते स्पेस स्टेशनवर गेले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com