Denmark's Queen: डॅनिश क्वीन मार्गरेट II ने चार नातवंडांकडून काढून घेतले शाही किताब

Queen Margaret-II of Denmark: डॅनिश क्वीन मार्गरेट II ने त्यांच्या आठ नातवंडांपैकी चार नातवंडांनाकडून शाही किताब काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Danish Queen Margaret II
Danish Queen Margaret IIDainik Gomantak
Published on
Updated on

Danish Royal Family: डॅनिश क्वीन मार्गरेट II ने त्यांच्या आठ नातवंडांपैकी चार नातवंडांनाकडून शाही किताब काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. 82 वर्षीय सम्राज्ञीने गुरुवारी जाहीर केले होते की, धाकटा मुलगा प्रिन्स जोआकिम यांची मुले पुढील वर्षापासून प्रिन्स म्हणून ओळखली जाणार नाहीत.

दरम्यान, रॉयल हाऊस ऑफ डेन्मार्क (Denmark) आणि राणीने जारी केलेल्या निवेदनानुसार, चार नातवंडांच्या (Without limiting the special considerations and duties) आयुष्याला आकार देण्यासाठी एक फ्रेमवर्क तयार करायचे आहे. वक्तव्यानुसार, चारही मुले उत्तराधिकाराच्या क्रमाने त्यांचे स्थान कायम ठेवतील.

Danish Queen Margaret II
Baba Vanga: रशिया आज तोडणार युक्रेनचा लचका, बाबा वेंगांचं भाकित ठरतयं खरं!

इतर राजघराण्यांनी अशा पद्धतीचा अवलंब केला

राणीचा हा निर्णय अलिकडच्या काही वर्षांत इतर राजघराण्यांनी विविध मार्गांनी स्वीकारलेल्या व्यवस्थेशी सुसंगत आहे. यापूर्वी, मे 2016 मध्ये, महाराणीचे एकुलते एक नातवंड असलेले हिज रॉयल हायनेस प्रिन्स क्रिश्चियन (Prince Christian) राज्याकडून वार्षिक भत्ता मिळविण्यास पात्र असतील, अशी घोषणाही करण्यात आली होती.

Danish Queen Margaret II
Baba Vanga: किती वर्षात होणार जगाचा अंत? बाबा वेंगाच्या भाकितांनी पुन्हा उडवली झोप !

तसेच, ब्रिटनवर (Britain) सर्वाधिक काळ राज्य करणारी राणी एलिझाबेथ II यांच्या निधनानंतर डेन्मार्कची राणी मार्गारेट II या युरोपमध्ये सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या सम्राट बनल्या आहेत. 82 वर्षीय मार्गारेट 50 वर्षांपासून डेन्मार्कच्या सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांचे वडील फ्रेडरिक IX (Frederick IX) यांच्या निधनानंतर वयाच्या 31 व्या वर्षी त्या 1972 मध्ये राणी बनल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com