ब्रिटनच्या क्वीन एलिझाबेथच्या (Queen Elizabeth) आरोग्याच्या तक्रारीमुळे त्यांच्या कामाची कर्तव्ये कमी करण्यात आली आहेत. न्यूयॉर्क पोस्टनुसार, राजेशाहीचा वार्षिक अहवाल, जो गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला होता, त्यात असे दिसून आले आहे की क्वीन एलिझाबेथ II ची राज्यप्रमुख म्हणून भूमिका कमी करून बदलण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 96 वर्षीय एलिझाबेथला फेब्रुवारीच्या सुरुवातीला कोरोनाची (Corona) लागण झाली होती आणि याशिवाय त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही जाणवल्या होत्या.
एका दशकात राणी एलिझाबेथच्या (Queen Elizabeth) भूमिकेचे औपचारिक पुनर्लेखन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या महिन्यात, राणीने रॉयल एस्कॉटचा पहिला दिवस देखील आरोग्याच्या (Health) समस्यांमुळे पाहु शकल्या नाही. तिच्या प्लॅटिनम ज्युबिली उत्सवादरम्यान त्या अस्वस्थतेमुळे चर्च सेवेत उपस्थित राहु शकल्या नाही. त्यानंतर त्या होलोग्रामद्वारे समारोपाच्या परेडमध्ये दिसल्या.
* वयाच्या समस्यांचा सामना
वय-संबंधित आजारांमुळे त्या सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये थँक्सगिव्हिंग सेवा कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्या म्हणाल्या "मी प्रत्येक कार्यक्रमाला वैयक्तिकरित्या उपस्थित नसले तरी माझे मन तुम्हा सर्वांसोबत आहे; आणि मी माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्याने माझ्या क्षमतेनुसार तुमची सेवा करण्यासाठी वचनबद्ध आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.