अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी सोडला देश

राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी (ashraf ghani) पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरु आहेत.
President of Afghanistan left the country
President of Afghanistan left the countryDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सुरू असलेला संघर्ष आता टोकाला जाऊन पोहोचला असाताना अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी (ashraf ghani) पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यातच आता अश्रफ घनी यांनी थेट देश सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालिबानी हल्ल्यांना सामोरे जाताना देशाची राजधानी काबुलपर्यंत (Kabul) पोहोचले असुन, नागरिक मोठ्या विध्वंसाला सामोरे जाताना त्रस्त झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रपतींना सुखरूप देशाबाहेर नेण्यासाठी अमेरिकेची हेलिकॉप्टर्सही पोहोचली आहेत.

अश्रफ घनी यांच्या नंतर कोण होऊ शकते राष्ट्राध्यक्ष

मुल्ला अब्दुल गनी बरादर (Mullah Ghani bardar) हे त्या चार लोकांपैकी एक आहेत ज्यांनी 1994 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची चळवळ सुरू केली. अफगाणिस्तानात सत्ता हस्तांतरित झाल्यानंतर ज्यांच्याकडे तालिबानची कमान सोपवली जाण्याची शक्यता आहे, अशा लोकांपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे मुल्ला बरदार हे आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती कार्यालयात तालिबान आणि आफगाणिस्तान सरकारच्या चर्चेची प्रक्रीया सुरु असतानाच तालिबान्यांनी मुल्ला बरादर यांना भावी अध्यक्ष घोषित केले आहे. जाणुन घेऊया कोण आहेत मुल्ला बराबर. अफगाणिस्तानच्या स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सत्ता हस्तांतरणाची प्रक्रीया

अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड टॉवरवर तालिबान्यांनी हल्ला केल्यानंतर अमेरिकेने तालिबानला गुडघे टेकायला लावल्यानंतर मुल्ला बरादरने दहशतवादाची सूत्रे हाती घेतली. तसेच, तो जास्त काळ मुक्त राहू शकला नाही. त्याला फेब्रुवारी 2010 मध्ये अटक करण्यात आली. तो पाकिस्तानच्या कराची शहरातून अमेरिका-पाकिस्तानच्या संयुक्त कारवाईत पकडला गेला. 2012 च्या अखेरीपर्यंत मुल्ला बरादरबद्दल फारशी चर्चा झाली नाही. तालिबानी कैद्यांच्या त्या यादीत त्याचे नाव अव्वल आहे ज्यांना अफगाण शांतता चर्चेला प्रोत्साहन देण्यासाठी सोडू इच्छित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com