America: मंकीपॉक्सबाधित मातेने दिला निरोगी बाळाला जन्म

Monkeypox Virus: अमेरिकेत मंकीपॉक्सची लागण झालेल्या एका गर्भवती महिलेने एका निरोगी बाळाला जन्म दिला आहे.
Pregnant Woman
Pregnant WomanDainik Gomantak
Published on
Updated on

Monkeypox Virus News: अमेरिकेत मंकीपॉक्सची लागण झालेल्या एका गर्भवती महिलेने एका निरोगी बाळाला जन्म दिला आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बाळाचा जन्म सुरक्षितपणे झाला असून आई आणि मूल दोघेही ठीक आहेत.' सीडीसीचे डॉ. जॉन ब्रूक्स म्हणाले की, 'एका गर्भवती महिलेने निरोगी बाळाला जन्म दिला.'

दरम्यान, एजन्सीने म्हटले आहे की, गरोदर किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांना आधी उपचार दिले जावेत.

Pregnant Woman
Monkeypox: सेक्स'मधून व्हायरसचं होतयं संक्रमण? तज्ञांचा इशारा

मुलाला इम्यून ग्लोबिन देण्यात आले

सीडीसीकडून सांगण्यात आले की, 'मुलाला इम्यून ग्लोबिन देण्यात आले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने इम्यून ग्लोबिन अँटीबॉडी उपचार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. अमेरिकेतील (America) दोन मुलांमध्ये मंकीपॉक्सचा (Monkeypox) विषाणू आढळून आला आहे. त्याच वेळी WHO ने ही जागतिक आणीबाणी घोषित केली आहे. स्पेनमध्ये (Spain) आतापर्यंत सर्वाधिक 3596 रुग्ण आढळले आहेत. डब्ल्यूएचओने देखील सल्ला दिला आहे की, 'जर एखाद्याला मंकीपॉक्सची लागण झाली असेल तर त्याने आपल्या जोडीदारासोबत सेक्स करणे टाळावे.'

Pregnant Woman
Monkeypox विषाणूने अमेरिका, ब्रिटनमध्ये उडवली खळबळ, जाणून घ्या लक्षणे

भारतात काय परिस्थिती आहे

भारतात (India) आतापर्यंत मंकीपॉक्सबाधित चार रुग्ण आढळून आले आहेत. मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता अनेक राज्यांनी अ‍ॅडव्हायझरी जारी केल्या आहेत. परदेशातून येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी केली जात आहे. मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी सरकारनेही युध्दपातळी तयारी केली आहे. केंद्र सरकारने मंकीपॉक्स लस आणि चाचणी किट बनवण्यासाठी कंपन्यांसाठी निविदा काढल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com