युरोपियन युनियन (EU) ने Pornhub, XVideos आणि Stripchat या पॉर्नोग्राफिक वेबसाइट्सना नवीन ऑनलाइन नियमांनुसार कठोर नियमांच्या अधीन असलेल्या फर्मच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. Pornhub, Xvideos आणि Stripchat ना आता वापरकर्त्याच्या वयाची पडताळणी करण्यासाठी आणि सामग्री व्यवस्थापन वर्धित करण्यासाठी कायद्याने आवश्यक असेल. कारण EU देशांमध्ये या वेबसाइट्सचा मासिक यूजर्स 45 दशलक्षांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, EU च्या डिजिटल सेवा कायद्या (DSA) नुसार, या पोर्नोग्राफिक वेबसाइट्सना कायदेशीर नियमांचे पालन करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी असेल, ज्यात डीपफेक पोर्नोग्राफी आणि बाल लैंगिक शोषणाचे व्हिडिओ यासारख्या बेकायदेशीर सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी नियमांची अंमलबजावणी करणे, अल्पवयीन मुलांना त्यांच्या वेबसाइट्सवर येण्यापासून रोखण्यासाठी अधिक मजबूत सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करणे समाविष्ट आहे.
दुसरीकडे, नियमांचे पालन होते की नाही याची खात्री करणे EU आयोगाच्या कक्षेत येईल हे देखील कायदेशीर आवश्यकतांचा एक भाग आहे. मात्र, या वेबसाइट्सनी नियमांचे पालन न केल्यास ते त्यांच्या जगभरातील उलाढालीच्या 6 टक्क्यांपर्यंत पर्यंत दंड आकारु शकते. दुसरीकडे, गुगल, फेसबुक आणि यूट्यूबसह 19 टेक कंपन्यांना नवीन नियम लागू झाल्याची माहिती एप्रिलमध्येच देण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.