तालिबानी सत्तेत पत्रकारितेचे हाल; 'इतक्या' पत्रकारांनी गमावल्या नोकऱ्या

उन्हाळ्याच्या सुरुवातीस अफगाणिस्तानमध्ये एकूण 543 मीडिया कंपन्या होत्या, मात्र नोव्हेंबरच्या अखेरीस यातील फक्त 312 कार्यरत राहिल्या.
Afghanistan Taliban

Afghanistan

Taliban

Dainik Gomantak

Published on
Updated on

तालिबानने फगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून देशातील 6,400 हून अधिक पत्रकारांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत व अफगाण पत्रकारीतेमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत, असे रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF) आणि अफगाण स्वतंत्र पत्रकार संघटना (AIJA) या संस्थानी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Afghanistan

Taliban

अमेरिकेत ओमिक्रोन व्हेरियंट करू शकतो कहर, डेल्टापेक्षाही अधिक प्रभावी

"उन्हाळ्याच्या सुरुवातीस अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) एकूण 543 मीडिया (Media) कंपन्या होत्या, मात्र नोव्हेंबरच्या अखेरीस यातील फक्त 312 कार्यरत राहिल्या. 43% अफगाण मीडिया कंपन्या तीन महिन्यांच्या कालावधीत बंद पडल्या," असे आरएसएफने (RSF) म्हटले आहे. चार महिन्यांपूर्वी, बहुतेक अफगाण प्रांतांमध्ये किमान 10 खाजगी मालकीच्या मीडिया कंपन्या होत्या, मात्र आता काही प्रदेशांमध्ये स्थानिक मीडियाच नाही.

Afghanistan

Taliban

अमेरिकेने दिला मोठा दिलासा, H-1B अन् वर्क व्हिसा अर्जदारांना मुलाखतीतून मिळणार सूट

"पर्वान प्रांतात पूर्वी 10 मीडिया आउटलेट्स होती, मात्र आता त्यातील फक्त तीनच कार्यरत आहेत. पश्चिमेकडील हेरात शहर (देशातील तिसरे सर्वात मोठे) आणि आसपासच्या प्रांतात, 51 पैकी फक्त 18 मीडिया आउटलेट अजूनही कार्यरत आहेत," असे आरएसएफने सांगितले.

तालिबानने (Taliban) ऑगस्टमध्ये ताबा घेतल्यानंतर मीडियाला स्वातंत्र्य आणि सरकारी अधिकाऱ्यांना माफी देण्याचे आश्वासन दिले होते. तालिबानकडून पत्रकारांवर होणाऱ्या कारवाईचे वृत्त समोर येत आहे. निदर्शने आणि रॅली कव्हर करणार्‍या पत्रकारांना तालिबानी सैनिक त्रास देतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com