पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आल्यापासून देशात राजकीय अस्थिरतेचे वातावरण तयार झाले आहे. अशा स्थितीत इम्रान खान सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. इम्रान सरकार पडलं आणि पीएमएल ( N) किंवा पीपीपीच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं, तर भारताबरोबर संबंध सुधारण्यासाठी काय पावले उचलली जातील हे ही आपल्याला पाहावं लागणार आहे. इम्रान खान (Imran Khan) यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केवळ वैयक्तिक टिकाटीपण्णी केली नाही, तर भारतासोबत व्यापार पुन्हा सुरु करण्याचा निर्णयही उलटवला आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये (Pakistan) अशीही शक्यता आहे की, 'खुद्द पीटीआयमधील अनेक बडे नेते मित्रपक्षांची नाराजी पाहता, इम्रान खान यांच्याऐवजी दुसऱ्याला पंतप्रधान बनवण्याचा विचार करु लागले आहेत.' सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हा देखील एक पर्याय आहे, जो विचाराधीन आहे. परंतु इम्रान हे सहजासहजी हे मान्य करणार नाहीत.'
तसेच, पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी ( PPP) च्या सुमारे 100 खासदारांनी 8 मार्च रोजी नॅशनल असेंब्लीच्या सचिवालयासमोर अविश्वास प्रस्ताव मांडला. त्यामध्ये त्यांनी आरोप केला की, 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ ( PTI) च्या नेतृत्वाखालील इम्रान खान सरकारच्या काळात देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे.' देशातील सध्याच्या आर्थिक संकटाला आणि वाढत्या महागाईला केवळ इम्रान खान सरकारचं जबाबदार असल्याचेही सांगितले जात आहे. अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल असेंब्लीचे अधिवेशन 21 मार्चला बोलावले जाण्याची शक्यता असून या प्रस्तावावर 28 मार्च रोजी मतदान होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानच्या संसदेतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे की, ''देशातील शक्तिशाली लष्कराने सध्याच्या राजकीय संकटात कुणाचीच बाजू घेतलेली नाही. त्याचबरोबर पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावालाही अनुकूलता दर्शवलेली नाही.'' समा टीव्हीच्या नदीम मलिक लाइव्ह या कार्यक्रमात शुक्रवारी रात्री शरीफ यांनी लष्करासोबतचे संबंध, नवीन लष्करप्रमुखाची नियुक्ती, निवडणूक सुधारणा आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीत लष्कराची भूमिका याविषयी मोकळेपणाने बोलले.
तसेच, पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ ( PML-N) चे अध्यक्ष आणि तीन वेळा पंतप्रधान झालेल्या नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ म्हणाले की, ''देशातील विरोधी पक्ष आम्हाला अंतरिम पंतप्रधान बनवू इच्छित आहे, परंतु अंतिम निर्णय पीएमएल-एनचे प्रमुख नवाझ घेतील.'' साम टीव्हीवरील मुलाखतीदरम्यान, शरीफ यांना सध्याच्या परिस्थितीत लष्करी आस्थापनांच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले, ज्यावर ते म्हणाले की, 'विरोधी सदस्यांना कोठूनही कॉल आलेले नाहीत.' ते पुढे म्हणाले, "मला कोणीकडूनही कॉल आलेला नाही. इम्रान खान म्हणायचे की, जेव्हा पंच तटस्थ होतो, तेव्हा सर्व काही निष्पक्ष होते.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.