पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोलिसांना आता टिकटॉक अ‍ॅप वापरता नाही येणार

या संदर्भात पोलीस विभागाकडून कडक मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.
TikTok
TikTokDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पोलिसांनी चीनचे शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉकवर बंदी घातली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्स आणि न्यूजनुसार, पंजाब पोलीस विभागाचा कोणताही कर्मचारी आता ड्युटीवर असताना हे अॅप वापरू शकणार नाही. या संदर्भात पोलीस (Police) विभागाकडून कडक मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये या अॅपवर कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ आढळून आल्यास त्याच्यावर कडक विभागीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा सर्व पोलिसांना देण्यात आला आहे. (Tiktok Banned In Punjab)

पंजाबच्या (Punjab) प्रांतीय पोलिसांनी या संदर्भात सर्व एआयजी ऑपरेशन्सना एक पत्र देखील जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, सोशल मीडियावर पोलिसांचे व्हायरल व्हिडिओ आणि TikTok शॉर्ट व्हिडिओ अॅपमुळे पोलिसांच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होत आहे. पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (PTA) याआधीही देशात अनेक ठिकाणी ते अनेकदा बंद करण्यात आले आहे.

TikTok
डोनाल्ड ट्रम्प मार्च अखेरीस लॉन्च करणार स्वतःचे सोशल मीडिया नेटवर्क

2020 मध्ये पहिल्यांदाच टिकटॉकवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली. मात्र, दहा दिवसांनंतरच ही बंदी उठवण्यात आली. कंपनीने त्यांच्या अॅपद्वारे नग्नता दाखवणारे व्हिडिओ ब्लॉक करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

चीनच्या या शॉर्ट व्हिडिओ अॅपवर जगातील अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. भारतातही त्यावर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर अमेरिकेनेही चीनच्या या अॅपवर बंदी घातली आहे. याशिवाय इतरही काही देशांनी या अॅपबाबत अशीच पावले उचलली आहेत. जरी ती अजूनही जगातील काही देशांमध्ये त्याची सेवा प्रदान करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com