Pakistan: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात न्यूमोनियाचा प्रादुर्भाव; 240 हून अधिक मुलांचा मृत्यू

Pneumonia Outbreak In Pakistan Punjab: पाकिस्तानातील पंजाबमध्ये न्यूमोनियाच्या प्रादुर्भावामुळे हाहाकार माजला आहे.
Pneumonia Outbreak In Pakistan Punjab
Pneumonia Outbreak In Pakistan PunjabDainik Gomantak
Published on
Updated on

Pneumonia Outbreak In Pakistan Punjab: पाकिस्तानातील पंजाबमध्ये न्यूमोनियाच्या प्रादुर्भावामुळे हाहाकार माजला आहे. न्युमोनियामुळे बालकांचा सातत्याने मृत्यू होत आहे. जानेवारी महिन्यात आतापर्यंत 244 बालकांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंजाबमध्ये गेल्या 24 तासांत या आजारामुळे सात मुलांचा मृत्यू झाला आहे. पंजाबच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, प्रांतात गेल्या 24 तासांत न्यूमोनियाचे 942 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली असून, एकट्या लाहोरमध्ये 212 नवीन रुग्णांची पुष्टी झाली आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, या महिन्यात प्रांतात 244 निमोनियाशी संबंधित मृत्यू झाले आहेत, ज्यात लाहोरमधील 50 मृत्यू आहेत.

दरम्यान, आरोग्य अधिकारी हिवाळ्याच्या मोसमात धुक्यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय प्रदूषणाला न्यूमोनियाच्या प्रकरणांमध्ये आणि त्यासंबंधित मृत्यूंमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास जबाबदार धरतात. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हिवाळ्यात वातावरणातील धुरामुळे न्यूमोनियाचे प्रमाण वाढण्यास मोठा हातभार लागतो. पंजाबमधील आरोग्य अधिकारी न्यूमोनियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता आणि इतर उपाययोजनांच्या गरजेवर भर देत आहेत.

Pneumonia Outbreak In Pakistan Punjab
Pakistan: भाकरीसाठी पाकिस्तानी जनता रस्त्यावर, हजारो आंदोलकांनी केला रास्ता रोको; जनजीवन ठप्प

न्यूमोनिया हा फुफ्फुसांशी संबंधित आजार आहे, जो सामान्यतः विषाणूंमुळे होतो. हे सर्दी किंवा फ्लूच्या लक्षणांचे अनुसरण करु शकते आणि सौम्य ते गंभीर पर्यंत असू शकतो. पाच वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये न्यूमोनिया अधिक सामान्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com