जपानच्या 40 तासांच्या दौऱ्यात मोदी 23 कार्यक्रमांना लावणार हजेरी

क्वाड समिट व्यतिरिक्त पीएम मोदी जपानचे पीएम फुमियो किशिदा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील.
जपानच्या 40 तासांच्या दौऱ्यात मोदी 23 कार्यक्रमांना लावणार हजेरी
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. युक्रेन आणि रशिया युद्धादरम्यान हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 24 मे रोजी पंतप्रधान मोदी क्वाड समिटमध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चेला देखील उपस्थित राहणार आहेत. 40 तासांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी जवळपास 23 कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. (PM Narendra Modi to attend 23 meetings in 40 hours in Japan)

जपानच्या 40 तासांच्या दौऱ्यात मोदी 23 कार्यक्रमांना लावणार हजेरी
PM मोदींचे टोकियोमध्ये 'जय श्री राम' च्या घोषणेने जोरदार स्वागत

क्वाड समिटमध्ये सहभागी होणार्‍या पंतप्रधान मोदींचे टोकियोमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांनी स्वागत केले. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जपानी मुलेही पोहोचली. मुलांनी पीएम मोदींचा ऑटोग्राफ घेतला. मोदी 24 मे रोजी टोकियो येथे होणाऱ्या क्वाड समिटमध्ये सहभागी होणार आहेत.

जपानच्या 40 तासांच्या दौऱ्यात मोदी 23 कार्यक्रमांना लावणार हजेरी
WHO ने भारतातील 10 लाख महिला आशा स्वयंसेविकांचा केला सन्मान

क्वाड समिट व्यतिरिक्त पीएम मोदी जपानचे पीएम फुमियो किशिदा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील. याशिवाय पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान मोदी जपानच्या उद्योगपतींसोबत बैठक घेणार आहेत. पीएम मोदी जपानच्या 30 सीईओंसोबत बैठक घेणार आहेत. काही कंपन्यांचे अध्यक्ष, सीआयओ यांचीही ते स्वतंत्र बैठक घेणार आहेत. या भेटीदरम्यान पीएम मोदी टोकियोमध्ये एक रात्र मुक्काम करतील, तर दोन रात्री विमानात घालवतील, असे सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com