G7 Summit: PM मोदींची क्रेझ! जॉर्जिया मेलोनी यांची भेट ठरली खास; सेल्फी घेत व्हिडिओ केला शेअर

PM Modi & Giorgia Meloni's Selfie Moment At G7: पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीचा एक फोटोही चर्चेत आला आहे.
PM Modi & Giorgia Meloni's Selfie Moment At G7
PM Modi & Giorgia Meloni's Selfie Moment At G7Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

PM Modi & Giorgia Meloni's Selfie Moment At G7: तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिला परदेश दौरा म्हणजे इटलीतील G7 शिखर परिषद. G7 मध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक परदेशी राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यादरम्यान G7 शिखर परिषदेतील सर्व नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी सर्वाधिक चर्चेत राहिले.

पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीचा एक फोटो चर्चेत आला आहे. इतकचं नाहीतर मेलोनी यांचा मोदींसोबतचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या हॅलो, मोदीजी... म्हणताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ आता खूप व्हायरल होत आहे.

गेल्या वर्षीही त्यांची सेल्फी चर्चेत होती

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री खूपच घट्ट असल्याचे दिसते. हे दोघे कोणत्याही कार्यक्रमात भेटले तर ते आपोआप प्रसिद्धीच्या झोतात येतात. इटलीतील G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींना भेटण्याचा आणि सेल्फी घेण्याचा मेलोनी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गेल्या वर्षी दुबईतील COP28 हवामान शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांचा सेल्फी घेतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

G7 परिषदेच्या निमित्ताने मोदी आणि मेलोनी यांच्यात विशेष चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही G7 शिखर परिषदेत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलोनी यांनी दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा केली. पीएमओ कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मेलोनी यांनी पीएम मोदींचे अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Modi Cabinet Reshuffle 2026
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
Gen Z Voters India Elections
PM Modi Digital India New Chapter
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com