Report: 2014-2023 हे आत्तापर्यंतचे सर्वात उष्ण दशक, संयुक्त राष्ट्राचे प्रमुख म्हणाले - ''पृथ्वी नामशेष होण्याच्या वाटेवर''

United Nations Report: गेल्या वर्षी उष्णतेने सर्व विक्रम मोडले. संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) नुकत्याच आलेल्या अहवालात याची पुष्टी झाली आहे.
United Nations Report
United Nations ReportDainik Gomantak
Published on
Updated on

United Nations Report:

गेल्या वर्षी उष्णतेने सर्व विक्रम मोडले. संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) नुकत्याच आलेल्या अहवालात याची पुष्टी झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने (World Meteorological Organization) मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, 2023 मध्ये प्रचंड उष्णता होती आणि ते सर्वात 'उष्ण वर्ष' म्हणून नोंदवले गेले. डब्ल्यूएमओच्या म्हणण्यानुसार, केवळ 2023 हे वर्षच नाही तर 2014 ते 2023 हे संपूर्ण दशक तीव्र उष्णतेचे राहिले. यूएनचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी तर पृथ्वी धोक्याच्या वाटेवर असल्याचे अहवालातून स्पष्ट केले आहे.

कडक इशारा

दरम्यान, याबाबत संयुक्त राष्ट्र (United Nations) प्रमुखांनी कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले की, बदल खूप वेगाने होत आहे. सातत्याने धोक्याचे संकेत मिळत आहेत. डब्ल्यूएमओच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी धरतीचे सरासरी तापमान पातळीपेक्षा 1.45 अंश सेल्सिअस जास्त होते. 2015 च्या पॅरिस हवामान करारामध्ये निर्धारित मर्यादा 1.5 अंश आहे. अहवालानुसार, ही रेड अलर्टची स्थिती आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षी सागरी उष्णतेच्या लाटेचा परिणाम जगातील एक तृतीयांश महासागरांवर झाला होता. 2023 च्या अखेरीस हा आकडा 90 टक्क्यांवर पोहोचला होता.

United Nations Report
United Nations Security Council: AI चा धसका; कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोक्याबाबत प्रथमच घेतली बैठक

समुद्राची वाढती पातळी

समुद्राच्या वाढत्या पातळीचाही अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामागील वाढत्या तापमानाचेही कारण सांगितले जात आहे. त्यानुसार वाढत्या उष्णतेमुळे हिमनद्या वेगाने वितळत आहेत. WMO ने अहवाल दिला आहे की, गेल्या दशकात (2014-2023), समुद्र पातळी मागील दशकाच्या तुलनेत दुप्पट वेगाने वाढली आहे. अशा हवामान बदलामुळे (Climate Change) जगभरात समस्या निर्माण होत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अतिउष्णता, पूर आणि दुष्काळाची प्रकरणे समोर येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com