Tomato Shortage in Britain: भारताचा शेजारी देश पाकिस्तान दिवसेंदिवस आर्थिक गर्तेच गटांगळ्या खात बुडत चालला आहे. तेथे जीवानावश्यक वस्तुंचा तुटवडा झाला असून त्याचे दर गगनाला भिडले आहेत.
पाकिस्तान काही विकसित राष्ट्र समजले जात नव्हते, पण विकसित समजल्या जाणाऱ्या आणि एकेकाळी ज्यांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता, अशा ब्रिटनमध्येही आता नागरीकांना भाज्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे.
विशेषतः गेल्या काही दिवपसांपासून ब्रिटनमध्ये टोमॅटोचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ब्रिटनवर पिझ्झा संकट ओढवले आहे.
पिझ्झा हा ब्रिटनमधील सर्वात आवडत्या खाद्यपदार्थांपैकी एक आहे. मात्र आता त्याची उणीव दिसून येत आहे. ब्रिटनमधील या पिझ्झा संकटामागे टोमॅटो कारणीभूत आहेत. प्रत्यक्षात टोमॅटोच्या कमतरतेमुळे अनेक कंपन्यांकडे पिझ्झासाठी अनिवार्य टोमॅटो बेस नाही.
ब्रिटनमध्ये टोमॅटोचे भाव काही दिवसांत 400 टक्क्यांनी वाढले आहेत. आहेत. टोमॅटोची किंमत पाच युरोवरून 20 युरोवर गेली आहे. याचा अर्थ असा आहे की आचाऱ्यांकडे स्वादिष्ट जेवण तयार करण्यासाठी फक्त काहीच अन्नघटक शिल्लक आहेत.
ब्रिटनमधील इटालियन शेफनी टोमॅटोचा तुटवडा असून सरकारने टोमॅटोच्या दरावर मर्यादा घालावी, अशी मागणी केली आहे.
आणखी एका इटालियन रेस्टॉरंटने सांगितले की, स्वयंपाकासाठी टोमॅटोऐवजी दुसरे काहीतरी वापरतो तेव्हा ग्राहकांना ते आवडत नाही. ग्राहक अजूनही टोमॅटो मागतात. टोमॅटोचे भाव असेच वाढत राहिल्यास पुढील तीन आठवड्यात टोमॅटो मेन्यूमधून बाहेर पडेल. टोमॅटोची जागा कुणीही घेऊ शकत नाही.
युरोप आणि उत्तर आफ्रिकेत खराब हवामानामुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे टोमॅटोबाबत आयातीवर अवलंबून असलेल्या ब्रिटनला मोठा फटका बसला. त्यामुळे यूकेच्या सुपरमार्केटमधून फळे आणि भाज्या गायब होत आहेत.
टोमॅटोचा तुटवडा असल्याने लोकांना भाजीपाला साठवून ठेवू नका, जास्त खरेदी करू नका असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही आठवड्यांत पुरवठा सुधारण्याची अपेक्षा आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.