Imran Khan
Imran KhanDainik Gomantak

Imran Khan: इम्रान खान यांच्या घरात सापडला पेट्रोल बॉंब अन् दारुगोळा

Imran Khan: पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे.
Published on

Imran Khan: पाकिस्तानचे तत्कालिन प्रधानमंत्री इम्रान खान गेल्या काही दिवसांपासून तोशखाना प्रकरणामुळे मोठ्या चर्चेत आहेत. तोशखाना प्रकरणात इम्रान खान यांची इस्लामाबाद कोर्टात काल सुनावणी पार पडली.

इम्रान खान या सुनावणीसाठी कोर्टात पोहचल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांना यावेळी इम्रान खान यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात दारुगोळा मिळाल्याचे म्हटले आहे. याबरोबरच, पेट्रोल बॉंब मिळाला आहे.

Imran Khan
Tajikistan Earthquake: ताजिकिस्तान पुन्हा हादरलं! रिश्टल स्केलवर 4.4 तीव्रता

दरम्यान, पोलिस आणि इम्रान खानचे समर्थक यांच्यातील वाढता संघर्ष लक्षात घेता न्यायालयाने त्यांचे अटक वॉरंट रद्द केले आहे.

इम्रान खान यांना पोलिस ( Police )अटक करण्यासाठी आल्यानंतर पोलिस आणि समर्थकांमध्ये झडप झाली होती. इम्रान खान यांच्यावर भष्टाचाराचा आरोप आहे. पाकिस्तान( Pakistan )च्या तोशखान्यातील किमती त्यांनी विकल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई सुरु करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com