इम्रानच्या नया पाकिस्तानात हिंदू असुरक्षित! दोन मुलींचे अपहरण करुन केलं 'धर्मांतरण'

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा धार्मिक अल्पसंख्याकांच्या छळाचे प्रकरण समोर आले.
persecution of religious minorities has once again come to fore in Pakistan

persecution of religious minorities has once again come to fore in Pakistan

Dainik Gomantak

Published on
Updated on

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा धार्मिक अल्पसंख्याकांच्या छळाचे प्रकरण समोर आले आहे. शेजारच्या देशाच्या सिंध प्रांतात एका अल्पवयीन मुलासह दोन हिंदू मुलींचे अपहरण करण्यात आले. यानंतर दोघांचे बळजबरीने धर्मांतर करून त्यांचे अपहरण करणाऱ्या लोकांनी लग्न लावून दिले. त्या पीडित मुलीचे वय 31वर्ष आहे, तर दुसरी 19 वर्षांची आहे. अशाप्रकारे इम्रान खान यांच्या 'नया पाकिस्तान'मधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचार पुन्हा एकदा समोर आला आहे.

<div class="paragraphs"><p>persecution of religious minorities has once again come to fore in Pakistan</p></div>
'मेरा पाकिस्तान, मेरा घर' इम्रान खान यांची नारेबाजी

सिंध (Sindh) प्रांतातील मीरपूर खास जिल्ह्यातील रोशनी मेघवार (Roshni Meghwar) या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. तिला बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यात आले आणि त्यानंतर तिच्या वयाच्या दुपटीपेक्षा जास्त वयाच्या पुरुषाशी तिचे लग्न लावून देण्यात आले. पाकिस्तानच्या (Pakistan) नॅशनल असेंब्लीचे सदस्य आणि देशातील अल्पसंख्याक नेते लालचंद मल्ही (LAL MALHI Member National Assembly of Pakistan) यांनी पीडितेची माहिती शेअर केली आहे. त्यांनी सत्ताधारी इम्रान खान (Imran Khan) यांच्या नेतृत्वाखालील पीटीआय सरकार अल्पसंख्याकांवरील अत्याचार आणि त्यांचे सक्तीचे धर्मांतर रोखण्यात अपयशी ठरल्याची टीका केली.

<div class="paragraphs"><p>persecution of religious minorities has once again come to fore in Pakistan</p></div>
चीन पुन्हा कोरोनाच्या विळख्यात ?

लालचंद मल्ही (Lal Chand Malhi) हे पाकिस्तानमध्ये मानवी हक्कांसाठी संसद सचिवही आहेत. 24 डिसेंबर रोजी, त्यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरून पीडितांच्या तपशीलांसह त्यांचे फोटो शेअर केले. रोशनी मेघवार हिचा विवाह अपहरणकर्ता मोहम्मद मुसा या मूळचा थारपारकर येथील व्यक्तीशी झाला आहे. त्याचबरोबर रोशनीचे नाव बदलून रझिया ठेवण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी मुलीचे अपहरण करून तिला बेकायदेशीरपणे कैदेत ठेवले होते. त्याच वेळी, 19 वर्षीय हरियान मेघवारचे (Hariyan Meghwar) अपहरण केले तिचे वय 31 वर्ष असून विवाहित असलेल्या भाई खानशी तिचे लग्न लावून देण्यात आले.

पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्याक हिंसाचाराचे बळी

इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांचे हाल सुरू आहेत. धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार, अल्पसंख्याक मुलींचे अपहरण, जबरदस्तीने धर्मांतर आणि धार्मिक संस्थांची तोडफोड अशा घटना वारंवार घडल्या आहेत. पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांवर जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या अनेक नोंदवलेल्या प्रकरणांपैकी ही काही प्रकरणे आहेत. अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करत नसल्याबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाकिस्तानवर वारंवार टीका होत आहे. मात्र, एवढं होऊनही पाकिस्तानमध्ये अशा घटनांमध्ये घट होताना दिसत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com