दिवास्वप्न पाहताय? मग दिवाळखोरीकडे वाटचाल कारताय... एका अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सकारात्मक विचार करण्याची सवय चांगली असते, असे वारंवार सांगितले जाते.
People
PeopleDainik Gomantak
Published on
Updated on

स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सकारात्मक विचार करण्याची सवय चांगली असते, असे वारंवार सांगितले जाते. यशाच्या जवळ जाण्यासाठी सकारात्मक उर्जा जिवंत ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. पण, बऱ्याचवेळा स्वप्नांचा पाठलाग करणारे दिवास्वप्नात अडकून पडतात. अशा लोकांसाठी एक चिंताजनक बातमी आहे.

अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, अति स्वप्नरंजन करणाऱ्या व्यक्ती दिवाळखोरीत निघण्याची शक्यता अधिक असते.

People
Russia-Ukraine War: युक्रेन युद्धात उत्तर कोरियाची उडी? रशियाच्या उपकाराची करणार परतफेड

व्यक्तीमत्व आणि सामाजिक मानसशास्त्र बुलिटीनमध्ये याबाबत अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे.

दिवास्वप्न पाहणारे लोक गुंतवणुकीबाबत (Investment )चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता अधिक असते. तसेच, अशा लोकांची अधिक उर्जा अवास्तव आणि क्षणिक यश मिळवण्यात अधिक खर्च होते. संशोधकांनी सुमारे 375 लोकांवर याबाबत संशोधन करत हा निष्कर्ष काढला आहे.

लुकास डिक्सन यांनी हा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. दिवास्वप्नांवर विश्वास ठेवणारे जलद श्रीमंत होण्यावर विश्वास ठेवतात आणि अधिक पैसा कमविण्यासाठी क्रिप्टो करन्सीमध्ये (Crypto Currency) गुंतवणूक करतात.

यामध्ये लवकर आणि अधिक पैसे मिळतात असा समज आहे. पण, असे निर्णय या लोकांना मोठे आर्थिक नुकसान आणि दिवाळखोरीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. असे डिक्सन यांनी म्हटले आहे.

People
Russia-Ukraine War: युक्रेन युद्धात रशियाचे मोठे नुकसान, पाच महिन्यांत 20 हजार रशियन सैनिक ठार; अमेरिकेचा दावा

अति स्वप्नरंजन करणाऱ्या लोकांचे स्वत:वर आणि त्यांच्या आयुष्यावर नियंत्रण आहे असे वाटत असते, पण ते अनियंत्रित असतात. असेही डिक्सन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दिवास्वप्न आणि दिवाळखोरी यांचा संबध संशोधकांना देखील आश्चर्यचकित करणारा ठरला. पण, दिवास्वप्नांवर अतिविश्वास ठेवल्याने अशा लोकांना जलद श्रीमंत होण्याचा मोह जडतो आणि ते दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल करतात. असे या अभ्यासातून समोर आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com