Plane Land Issue
Plane Land IssueDanik Gomantak

उड्डाणादरम्यान पायलटची प्रकृती खालावली, प्रवाशाने दाखवले प्रसंगावधान

त्यामुळे विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले
Published on

उड्डाणा दरम्यान, विमानाच्या पायलटची प्रकृती खालावली, त्यानंतर एका प्रवाशाने विमानावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली. त्याला विमान उडवण्याचा अनुभव नव्हता. मात्र सेसना कॅरव्हान नावाच्या विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात त्याला यश आले. (passenger with no flying experience safely lands plane after pilot gets sick)

हे प्रकरण अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. WPBF-TV नुसार, पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही अनोखी घटना घडली. त्या व्यक्तीने हवाई वाहतूक नियंत्रकांच्या मदतीने लँडिंग केले. प्रवासी म्हणाला- मी कठीण परिस्थितीत होतो.

सेसना कारवाँच्या प्रवाशाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला सांगितले - माझा पायलट शुद्धीत नाही. मला विमान उडवण्याबद्दल काहीच माहिती नाही. त्यानंतर तो जमिनीपासून सुमारे 112 किमी दूर होता. सेसना नुसार, हे 38 फूट लांब विमान ताशी 346 किलोमीटर वेगाने धावू शकते. यात 14 लोक बसू शकतात.

Plane Land Issue
राजधानी दिल्लीत मोठी कारवाई, दुबईमार्गे आलेले 434 कोटींचे हेरॉईन जप्त

रिपोर्टनुसार, एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या डिस्पॅचरने प्रवाशाला विचारले - तुमची स्थिती काय आहे? उत्तर आले - मला काही कल्पना नाही. नियंत्रकांनी विमान खाली आणण्यास मदत केली आणि अखेर त्यांना विमानाचा शोध घेण्यात यश आले. त्यानंतर विमान बोका रॅटनच्या पाल बीचच्या उत्तरेला 40 किमी अंतरावर होते. तेथून वाहतूक नियंत्रकाने प्रवाशाला मार्गदर्शन केले. त्यामुळे विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले.

यानंतर, रोडिओवर एक कंट्रोलर म्हणाला - विमान उतरताना काही प्रवाशांनी नुकतेच पाहिले आहे. ज्यानंतर लोक हैराण झाले. एव्हिएशन एक्सपर्ट जॉन नॅन्सी म्हणाले - हे पहिल्यांदाच घडले आहे. हे सेस्ना कॅरव्हान विमान एरोनॉटिकल अनुभव नसलेल्या व्यक्तीने सुरक्षितपणे उतरवल्याचे मी कधीच ऐकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com