इम्रान खान यांची सुरक्षा वाढवण्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांचे निर्देश

लाहोरमधील रॅलीदरम्यान इम्रान खान यांच्या सुरक्षेबाबत सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी केला होता.
Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या
सुरक्षेत वाढ करण्याचे गृह मंत्रालयाला निर्देश दिले आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

Imran Khan
रशियाचा ताण वाढणार, 51 टक्के लोक नाटोमध्ये सामील होण्याच्या मार्गावर

लाहोरमधील (Lahore) रॅलीदरम्यान इम्रान खान यांच्या सुरक्षेबाबत सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी केला होता. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, शाहबाज शरीफ यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी तातडीने प्रभावी पावले उचलण्यास सांगितले आहे. शांततापूर्ण सार्वजनिक सभा हा लोकशाहीचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले असून त्यात कोणताही अडथळा आणू नये, असे निर्देश दिले आहेत.

पंतप्रधानपद सोडल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये एका भव्य सभेला संबोधित केले. 10 एप्रिल रोजी पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांचे हे पहिलेच शक्तीप्रदर्शन होते. इम्रान यांच्या या रॅलीमुळे पुन्हा एकदा पक्षाची पुनर्रचना करण्यात मदत होईल, असे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Times Square shooting during NBA celebration
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com