Bilawal Bhutto: भारताशी वाटाघाटी करायला चाललेलो नाही; गोव्यातील SCO बैठकीविषयी भुट्टोंचे धक्कादायक वक्तव्य

केवळ एका देशावर लक्ष केंद्रीत करत नाही, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचेही मत
Bilawal Bhutto Zardari
Bilawal Bhutto ZardariDainik Gomantak
Published on
Updated on

Bilawal Bhutto On SCO meet in Goa: शांघाय कोऑपरेटिव्ह संघटनेतील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ४ मे रोजी गोव्यात होणार आहे. या बैठकीसाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी देखील येणार आहेत.

तत्पुर्वी त्यांनी पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत भारताशी संबंध सुधारण्यासाठी ही भेट नाही, असे वक्तव्य केले आहे.

भुट्टो म्हणाले की, आम्ही एससीओ चार्टरसाठी वचनबद्ध आहोत. या भेटीला भारतासोबतच्या चर्चेच्या संदर्भात पाहिले जाऊ नये. भारतासोबत वाटाघाटी करण्यासाठी चाललेलो नाही. ही भेट एससीओ या संघटनेपुरतेच मर्यादित ठेवा, असे मत भुट्टो यांनी व्यक्त केले आहे.

Bilawal Bhutto Zardari
PM Modi's Kerala Visit: 'केरळमध्ये PM मोदींवर हल्ल्याची धमकी', भाजप प्रदेशाध्यक्षांना मिळाले पत्र!

दरम्यान, यापूर्वी, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. SCO च्या बैठकीत केवळ कोणत्याही एका सदस्य देशावर लक्ष केंद्रित करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले होते.

दरम्यान, गेल्या 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतत येत आहेत. यापूर्वी 2011 मध्ये पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी खार भारतात आल्या होत्या.

पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ अनेक वर्षांनी 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारतात आले होते. त्यानंतर 2015 मध्ये पीएम मोदींनीही पाकिस्तानला भेट दिली होती.

परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारताने चीन आणि पाकिस्तानसह SCO संघटनेच्या आठ देशांना निमंत्रण पाठवले आहे. 4 मेपासून सुरू होणाऱ्या बैठकीत चीन आणि रशियाचे परराष्ट्र मंत्रीही उपस्थित राहणार असल्याचे समजते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताला SCO संघटनेचे अध्यक्षपद मिळाले आहे.

Bilawal Bhutto Zardari
Google Lay off: गुगलमध्ये एकीकडे 12,000 कर्मचाऱ्यांची कपात; तर दुसरीकडे CEO ना तब्बल 'इतका' पगार

दरम्यान, माजी सनदी अधिकारी अनिल त्रिगुनायत यांनी म्हटले आहे की, 'बिलावल यांच्या दौऱ्याने काहीही बदलणार नाही. मात्र, या भेटीदरम्यान फारसे मतभेद न झाल्यास जुलैमध्ये पंतप्रधानांच्या बैठकीसाठी शाहबाज शरीफ भारतात येऊ शकतात.

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना 2001 मध्ये झाली. यात भारत, रशिया, चीन, पाकिस्तान, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान आणि उझबेकिस्तान हे देश आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com