Kenya: इम्रान खान यांच्या निकटवर्तीय पत्रकाराची गोळ्या घालून हत्या, देशद्रोहाचा होता आरोप

अर्शद शरीफ यांनी इम्रान खान यांचे निकटवर्तीय शेहबाज गिल यांची मुलाखत घेतल्याबद्दल ऑगस्टमध्ये त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अर्शद शरीफ
अर्शद शरीफ दैनिक गोमन्तक
Published on
Updated on

पाकिस्तानमधील एका ज्येष्ठ पत्रकाराची केनियात (kenya) गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणांनी देशद्रोह आणि राज्यविरोधी काम केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे हा पाकिस्तानी पत्रकार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा निकटवर्तीय मानला जात होता. (Senior Pakistani Journalist Shot dead in kenya)

अर्शद शरीफ
Britain News: ऋषी सुनक आज ब्रिटनचे पंतप्रधान बनू शकतात - वाचा 10 महत्वाचे मुद्ये

अर्शद शरीफ (वय 49) असे या पत्रकाराचे नाव असून, त्याने ARY टीव्हीसाठी रिपोर्टर तसेच, टीव्ही अँकर म्हणून काम केले होते. मागील काही महिन्यांपासून अर्शद शरीफ केनियामध्ये स्थलांतरित झाले होते. शरीफ यांच्या पत्नी जवेरिया सिद्दीकी यांनी सोमवारी ट्विट करत आपल्या पतीचे निधन झाल्याची माहिती दिली.

"मी आज एक मित्र, पती आणि माझा आवडता पत्रकार गमावला, पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याला केनियामध्ये गोळ्या घालण्यात आल्या," असे ट्विट जवेरिया सिद्दीकी यांनी केले आहे.

अर्शद शरीफ
रशियाचा आरोप - युक्रेन आपल्या भूमीवर डर्टी बॉम्ब टाकू शकतो, जाणून घ्या किती धोकादायक आहे 'Radioactive Dirty Bomb'

पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते असीम इफ्तिखार केनियातील पाकिस्तान उच्चायुक्तालय अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेत आहेत. अर्शद शरीफ यांनी इम्रान खान यांचे निकटवर्तीय शेहबाज गिल यांची मुलाखत घेतल्याबद्दल ऑगस्टमध्ये त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अर्शद शरीफ यांनी आपला देश सोडून केनियामध्ये आश्रय घेतला. त्याचवेळी त्यांनी आपण ARY पासून "वेगळे" झालो असल्याचे सांगितले. शरीफ यांचा जन्म 1973 मध्ये कराची येथे झाला आणि तीन दशकांपूर्वी त्यांनी पत्रकारितेला सुरूवात केली. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्या हस्ते त्यांना 2019 मध्ये 'प्राइड ऑफ परफॉर्मन्स' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com