पाकिस्तानमधील कराची विद्यापीठात मंगळवारी 26 एप्रिल रोजी एक बॉम्ब स्फोट झाला होता. हा स्फोट विद्यापीठातील फॉरेन फॅकल्टीपासून कन्फ्यूशियस केंद्राच्या दिशेने येणाऱ्या व्हॅनमध्ये हा स्फोट झाला. यामध्ये संचालक आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. तसेच स्फोट झालेल्या व्हॅनच्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाला आहे. हा हल्ला पाकिस्तानी उच्चशिक्षित महिलेने चिनी ताफ्यावर आत्मघातकी बॉम्ब हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. ( A Pakistani highly educated woman bombed a Chinese convoy )
याबाबत धक्कादायक माहिती अशी कि, कराची विद्यापीठातील चायनीज सेंटरजवळस्वत:ला उडवणारी महिला उच्चशिक्षित होती. तिने एम. एस. सी. झूलॉजी केले होते. आणि ती सध्या एम. फील करत असल्याचं ही स्पष्ट झालं आहे. या महिलेला दोन लहान मुले आहेत. ज्यामुळे तिला बीएलए सोडण्याचा पर्याय देखील देण्यात आला होता.
या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली असुन त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात चीनला इशारा दिला आहे. कि पाकिस्तानात सुरू असलेले त्यांचे 'शोषण' प्रकल्प ताबडतोब थांबवावेत. या हल्ल्यात मृत झालेल्यांमध्ये हुआन गुइपिंग, दिंग मुपेंग आणि चेन साई अशी नावे आहेत. तर मृत्यू झालेल्या ड्रायव्हरचे नाव खालिद आहे. या स्फोटात एक चिनी नागरिक आणि एक स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.