SCO बैठकीसाठी पाकिस्तानी शिष्टमंडळ भारतात

सध्या SCO चे आठ सदस्य चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया (Russia), ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) हे आहेत.
सध्या SCO चे आठ सदस्य चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया (Russia), ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan)  हे आहेत.
सध्या SCO चे आठ सदस्य चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया (Russia), ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) हे आहेत. Dainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: भारत (India) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) देशांसाठी सायबर सुरक्षा सेमिनार आयोजित करणार आहे. 7 आणि 8 डिसेंबरला दोन दिवसीय कार्यक्रम नवी दिल्लीत होणार आहे. याच क्रमासाठी पाकिस्तानचे (Pakistan) एक शिष्टमंडळ भारतात आले आहे. SCO देशांच्या सायबर सुरक्षा परिषदेत त्याचा समावेश केला जाईल. याआधी भारताचे एक शिष्टमंडळ ऑक्टोबरमध्ये एससीओच्या दहशतवादविरोधी बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला गेले होते.

सध्या SCO चे आठ सदस्य चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया (Russia), ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan)  हे आहेत.
SCO Summit: तालिबाननसह अनके मुद्यांवरून पंतप्रधानांनी पाकिस्तानला झापले

या कार्यक्रमाचे आयोजन SCO - RATS (प्रादेशिक दहशतवादविरोधी संरचना) च्या अंतर्गत करण्यात आले होते. याचे मुख्यालय ताश्कंद येथे आहे. RATS चा उद्देश SCO सदस्य देशांना दहशतवादा विरुद्धच्या लढाईत मदत करणे हा आहे.

SCO मध्ये आठ सदस्य देश आणि चार निरीक्षक देश

सध्या SCO चे आठ सदस्य चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान हे आहेत. याशिवाय अफगाणिस्तान, बेलारूस, इराण आणि मंगोलिया हे चार निरीक्षक देश आहेत. SCO चे मुख्यालय चीनची राजधानी बीजिंग येथे आहे. आर्मेनिया, अझरबैजान, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका आणि तुर्की हे सहा संवाद भागीदार आहेत. SCO ही सध्या जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संघटना मानली जाते. ऊर्जा पुरवठ्याशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे आणि दहशतवादाशी लढा देणे हे SCO चे मुख्य उद्दिष्ट आहे. अमेरिकेने माघार घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील एससीओची भूमिका वाढली आहे.

सध्या SCO चे आठ सदस्य चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया (Russia), ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan)  हे आहेत.
कट्टरतावाद अन् दहशतवाद थांबवणं SCO चं मुख्य उद्दीष्ट: पीएम मोदी

सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण द्विपक्षीय संबंध तणावपूर्ण आहेत. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमधील द्विपक्षीय चर्चा रखडली आहे. SCO च्या बॅनरखाली दोन्ही देशांमध्ये चर्चा होत असली तरी, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयातर्फे सायबर सुरक्षा परिषद आयोजित केली जात आहे. NSCS ने अलीकडेच SCO च्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची अफगाणिस्तानबाबत बैठक आयोजित केली होती. चीन आणि पाकिस्तान वगळता SCO चे सर्व पूर्ण सदस्य या बैठकीत सहभागी झाले होते.

भारत 2017 पासून या संघटनेचा सदस्य

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना 15 जून 2001 रोजी चीन, रशिया आणि चार मध्य आशियाई देशांनी (कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान) केली. भारत 2017 मध्ये SCO चा पूर्णवेळ सदस्य झाला. 2005 पूर्वी त्याला निरीक्षक दर्जा होता. 2017 मध्ये 17 व्या SCO शिखर परिषदेत भारत आणि पाकिस्तानला सदस्य देशाचा दर्जा देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com