शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेत सध्या अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) निर्माण झालेल्या परिस्थितीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी लक्ष वेधले आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, अफगाणिस्तानमध्ये कट्टरतावादामुळे झालेले आव्हान अधिक स्पष्ट झाले आहे. कट्टरताविरोधी लढणे केवळ प्रादेशिक सुरक्षा आणि आत्मविश्वासासाठीच नव्हे तर तरुणांचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे. एससीओ परिषदेत पंतप्रधान मोदींनी नवीन मित्र देशांचे स्वागत केले. ते म्हणाले, 'यावर्षी आम्ही एससीओचा 20 वा वर्धापन दिनही साजरा करत आहोत. ही आनंदाची बाब आहे की, या शुभ प्रसंगी नवीन मित्र आमच्यासोबत सामील होत आहेत. मी SCO चा नवीन सदस्य देश म्हणून इराणचे स्वागत करतो. सौदी अरेबिया (Saudi Arabia), इजिप्त आणि कतार या तीन डायलॉग पार्टनर्स यांचही स्वागत करतो.
SCO ने एक मजबूत नेटवर्क तयार करण्यासाठी काम केले पाहिजे
आपल्या संबोधनात मोदी पुढे म्हणाले, एससीओने उदारमतवादी, सहिष्णु आणि सर्वसमावेशक संस्था आणि इस्लामशी संबंधित परंपरांमध्ये मजबूत संबंध विकसित करण्यासाठी काम केले पाहिजे. पीएम मोदी पुढे म्हणाले, 'भारतात आणि एससीओच्या जवळजवळ सर्व देशांमध्ये इस्लामशी संबंधित उदारमतवादी, सहिष्णु आणि सर्वसमावेशक संस्था आणि परंपरा आहेत. SCO ने त्यांच्यामध्ये मजबूत नेटवर्क विकसित करण्यासाठी काम केले पाहिजे. या संदर्भात, मी SCO च्या RATS यंत्रणेद्वारे केलेल्या उपयुक्त कार्याचे कौतुक करतो.
दरम्यान, पंतप्रधान म्हणाले की, जर आपण इतिहास पाहिला तर आपल्याला जाणून येईल की, मध्य आशियाई क्षेत्र (Central Asian region) उदारमतवादी, पुरोगामी संस्कृती आणि मूल्यांचा दाता आहे. येथेच सूफी परंपरा बहरली आणि त्यानंतर त्याचा विस्तार संपूर्ण क्षेत्रबरोबर जगभरात झाला. या प्रदेशाच्या सांस्कृतिक वारशामध्ये त्यांची प्रतिमा आपण आजही पाहू शकतो. 'आर्थिक समावेशन वाढवण्यासाठी UPI आणि RuPay कार्ड सारखे तंत्रज्ञान असो, किंवा कोरोना विरुद्धच्या लढ्यात आरोग्य-सेतू आणि Kovin सारखे डिजिटल प्लॅटफॉर्म असो, हे सर्व आम्ही इतर देशांबरोबर स्वेच्छेने शेअर केले आहेत.'
भारत मध्य आशियाशी संपर्क वाढवण्यासाठी वचनबद्ध
आशियाई क्षेत्रातील कनेक्टिव्हिटीवर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत मध्य आशियाशी आपली कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. आमचा विश्वास आहे की लँडलॉक मध्य आशियाई देश भारताच्या विशाल बाजाराशी जोडल्याने मोठा फायदा होऊ शकतो. कोणताही कनेक्टिव्हिटी उपक्रम एकतर्फी असू शकत नाही.
ते पुढे म्हणाले की, परस्पर विश्वास सुनिश्चित करण्यासाठी कनेक्टिव्हिटी प्रकल्प सल्लागार, पारदर्शी आणि भागीदारी असली पाहिजे. यामध्ये सर्व देशांच्या प्रादेशिक अखंडतेचा आदर अंतर्भूत असावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.