Pakistan's Minister Shazia Marri
Pakistan's Minister Shazia MarriDainik Gomantak

Pakistan Minister: पाकच्या महिल्या मंत्र्याची भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी; म्हणे, आमच्याकडील अणुबॉम्ब...

बिलावल भुट्टोंनंतर पाकिस्तानच्या आणखी एका मंत्र्यांचे प्रक्षोभक वक्तव्य
Published on

Pakistan Minister: पाकिस्तानचे परराष्ट्र बिलावल भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरील टीका करून काही तास उलटत नाहीत तोवर आता पाकिस्तानच्या आणखी एका महिला मंत्र्याने प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. पाकिस्तानमधील या महिला मंत्र्याने भारताला थेट अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे.

Pakistan's Minister Shazia Marri
Russia-Ukraine War: युद्ध एकतर रशिया जिंकेल, नाहीतर जगाचा नाश होईल... पुतिन यांच्या गुरूचा दावा

पाकिस्तानच्या महिला मंत्री शाझिया मरी (Shazia Marri) यांनी शनिवारी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली. बिलावलच्या समर्थनार्थ घेतलेल्या पत्रकार परिषदेत शाजिया म्हणाल्या की, आम्ही शांत बसण्यासाठी अणुबॉम्ब बनवलेला नाही. भारताकडून काही कारवाई झाल्यास त्याला उत्तर दिले जाईल. पाकिस्तानला कसं उत्तर द्यायचं ते माहीत आहे. एक थप्पड मारल्यावर दुसरा गाल समोर करणारा पाकिस्तान हा देश नाही. मी अनेक मंचांवर मोदी सरकारने पाठवलेल्या प्रतिनिधींशी लढले आहे.'

शाझिया म्हणाल्या की, भारतीय मंत्र्याने यूएनमध्ये पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र असल्याचे म्हटले आहे. हा सर्व त्यांचा अपप्रचार आहे. हे फक्त आजचेच नाही. आम्हाला आमच्या देशाविरुद्धच्या चुकीच्या प्रचाराचे षडयंत्र उघड करायचे आहे. आम्ही शांतताप्रिय आणि सभ्य लोक आहोत.

Pakistan's Minister Shazia Marri
Terrorism: आतंकवाद कधी संपणार हे तुमच्या मंत्र्यांना विचारा- एस.जयशंकर यांचे पाकिस्तानच्या पत्रकाराला उत्तर

बिलावल भुट्टो यांनी गुरुवारी, ओसामा बिन लादेन मेला आहे, पण गुजरातचा कसाई अजूनही जिवंत आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर भारतात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. दिल्लीतील पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते, तसेच देशभरात भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com