'सुपरसॉनिक मिसाइल' कोसळल्यानंतर पाकिस्तानने भारताकडे मागितले उत्तर

या हायस्पीड फ्लाइंग ऑब्जेक्टमुळे भारतीय आणि पाकिस्तानी हवाई हद्दीतील अनेक प्रवासी उड्डाणे धोक्यात आली आहेत
DG ISPR Major General Babar Iftikhar | Pakistan latest news |Pakistan seeks answers from India
DG ISPR Major General Babar Iftikhar | Pakistan latest news |Pakistan seeks answers from India Twitter/@PAFFalconsPK
Published on
Updated on

इस्लामाबाद: भारतीय हायस्पीड फ्लाइंग ऑब्जेक्टने (supersonic missile) पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे. हा फ्लाइंग ऑब्जेक्ट (Indian Projectile In Pakistan) ताशी 124 किलोमीटर वेगाने पाकिस्तानी हद्दीत घुसला. हा भारतीय हायस्पीड फ्लाइंग ऑब्जेक्ट खानवाल जिल्ह्यातील मियां चन्नू इंडियन प्रोजेक्टाइलजवळ (Mian Channu Indian Projectile) पडला, ज्यामुळे आजूबाजूच्या भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र या दाव्यांवर भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, असे पाकिस्तानी लष्कराच्या प्रचार शाखा इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. यापूर्वी मियां चन्नू येथे खासगी विमान कोसळल्याचे सांगण्यात आले होते. (Pakistan seeks answers from India after supersonic missile crashes near Mian Channu)

DG ISPR Major General Babar Iftikhar | Pakistan latest news |Pakistan seeks answers from India
पाकिस्तानमध्ये मोठी दुर्घटना, हवाई दलाचे कोसळले विमान

ताशी 124 किमी वेगाने पाकिस्तानात घुसले

डायरेक्टर जनरल इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) मेजर जनरल बाबर म्हणाले की, पाकिस्तानने या घटनेचा तीव्र निषेध केला आणि भारताकडून स्पष्टीकरण मागितले आहे. भारतातून पाकिस्तानात प्रवेश करताना हा फ्लाइंग ऑब्जेक्ट ताशी 124 किलोमीटर वेगाने प्रवास करत असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की आम्ही वेळेत वस्तू शोधून काढली आणि मानक ऑपरेटिंग प्रक्रियेनुसार (SOP) आवश्यक कारवाई केली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही बाबर यांनी स्पष्ट केले. (Pakistan latest news updates)

ही वस्तू 9 मार्च रोजी पाकिस्तानी हवाई क्षेत्रात घुसली होती

डीजी ISPR ने सांगितले की, 9 मार्च रोजी संध्याकाळी 6:43 वाजता, पाकिस्तानी हवाई दलाच्या एअर डिफेन्स ऑपरेशन्स सेंटरने भारतीय हद्दीत एका हाय-स्पीड फ्लाइंग ऑब्जेक्टचा मागोवा घेतला होता. नंतर ते आपल्या सुरुवातीच्या मार्गापासून दूर गेले आणि पाकिस्तानच्या हद्दीत घुसले आणि कोसळले. यामुळे पाकिस्तानच्या नागरी आस्थापनांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यानंतर पाकिस्तानी हवाई दलाने रणनीती आखून कारवाई सुरू केली आहे.

DG ISPR Major General Babar Iftikhar | Pakistan latest news |Pakistan seeks answers from India
इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळे अर्ध्या रस्त्यातचं उतरले डोनाल्ड ट्रॅम्प

पाकिस्तानचा दावा

मोठा अपघात होऊ शकतो असा दावा पाकिस्तानने केला आहे. या वस्तूच्या उड्डाण मार्गामुळे पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील नागरिक धोक्यात आले आहेत. याचे कारण काय? असा प्रश्न पाकिस्तानने भारताला विचारला. याचा भारताच्या विमान वाहतुकीवर वाईट परिणाम होऊ शकतो, असा आरोपही पाकिस्तानने केला आहे. इफ्तिखार बाबर यांनी तर यापेक्षा मोठी विमान दुर्घटना घडू शकली असती असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com