Pakistan Crisis: कंगाल पाकिस्तानात पैशाचा पाऊस, लग्नातील उधळपट्टी पाहून...

Pakistan Economic Crisis: लग्नात आवश्‍यकतेपेक्षा जास्त खर्च करण्याचा ट्रेंड बनला आहे. केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही महागडे विवाह होत आहेत
Sami Khan
Sami KhanDainik Gomantak

Pakistan Economic Crisis: लग्नात आवश्‍यकतेपेक्षा जास्त खर्च करण्याचा ट्रेंड बनला आहे. केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही महागडे विवाह होत आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानमध्ये एका लग्नात झालेल्या प्रचंड उधळपट्टीबद्दल पाकिस्तानी चित्रपट अभिनेता सामी खान याने दु:ख व्यक्त केले आहे. सामी खानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पाकिस्तानमधील एका लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लग्नाच्या फंक्शनमध्ये नोटांचा पाऊस पाहून तो दु:खी झाला.

दरम्यान, आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नाचा व्हिडीओ शेअर करताना सामी खानने (Sami Khan) लिहिले की, 'हा असा देश आहे, जिथे एक गरीब व्यक्ती आपल्या मुलांना अन्न मिळावे यासाठी रांगेत उभा आहे. अस्तगफिरुल्ला (एखाद्याच्या चुकांसाठी क्षमा मागणे).'

Sami Khan
Pakistan Economic Crisis: दाने-दाने को मोहताज...! लाखो पाकिस्तानी लोकांसाठी निर्माण झालं विनाशकारी संकट

तसेच, सामी खानचे खरे नाव मन्सूर अस्लम खान नियाझी आहे, जरी तो सामी खान या नावाने ओळखला जातो. सामी हा पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.

Sami Khan
Pakistan Crisis: पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिघडली, 1 किलो मैद्याच्या किमतीने...

पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली

पाकिस्तान (Pakistan) सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. महागाई गगनाला भिडत आहे. दूध, पीठ यासारख्या मूलभूत गोष्टींच्या किमती तर वाढत आहेतच, पण तुटवडाही आहे. तीन दिवसांपूर्वी बलुचिस्तानचे खाद्य मंत्री झामरक अचकझाई यांनी सांगितले की, प्रांतातील गव्हाचा साठा संपला असून पिठाचे संकट अधिक गंभीर झाले आहे. बलुचिस्तानला (Balochistan) तातडीने चार लाख पोती गव्हाची गरज असल्याचेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com