UNSC: भारताने अलीकडेच म्हणजेच डिसेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्राचे अध्यक्षपद सांभाळले आहे. भारत अध्यक्षपदावर आल्यानंतर पाकिस्तानचे मंत्री भारताला आतंकवादाच्या मुद्द्यावर अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
भारत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा 2 वर्षासाठी अस्थायी सदस्य आहे. आता दुसऱ्यांदा भारताने सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. दरम्यान पाकिस्तान आतंकवादावर प्रश्न विचारले जाऊ नयेत यासाठी स्वतः यावर प्रश्न निर्माण करून स्वतःला सुरक्षित करत आहे. त्याचबरोबर पाकिस्तान चे मंत्री पत्रकार परिषदा घेऊन भारताविरुद्ध जनमत तयार करत आहेत. पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भूत्तो यांनी सुरक्षा परिषदेत जम्मू काश्मीर चा मुद्दा मांडत भारताने अवैधरित्या जम्मू काश्मीरवर ताबा मिळवला केला आहे. त्याचबरोबर ,भारत तिथल्या जनतेवर अत्याचार करत आहे.
दरम्यान, बिलावल भूत्तोंनी मागणी केली आहे कि काश्मीर मुद्द्यावर UNSC चा प्रस्ताव लागू करण्यात यावा. पाकिस्तानच्या या भूमिकेवर भारता ( India ) ने पाकिस्तानला सुनावले आहे. जो देश ओसामा बिन लादेन सारख्या आतंकवाद्याला आसरा देऊ शकतो आणि आपल्या शेजारी देशाच्या संसदेवर हल्ला करू शकतो त्या देशाने उपदेश देऊ नयेत असे भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.