'हम साथ साथ'; नवाझ शरीफांची लेक करणार इम्रान खानशी मैत्री

पोलिटिकल फ्रेंडशीप: इम्रान खान मारियम नवाज येणार एकत्र, पंजाबमधील 20 प्रांतीय विधानसभेच्या जागांवर रविवारी पोटनिवडणूक होणार आहे.
MARYAM Nawaz and Imran khan
MARYAM Nawaz and Imran khanDainik Gomantak

लाहोर: पाकिस्तानातील सत्ताधारी पीएमएल-एनच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कन्या मरियम नवाझने (MARYAM Nawaz) प्रथमच इम्रान खान (Imran Khan) यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ समोर 'मैत्रीचा हात' पुढे केला आहे. पंजाब प्रांतातील महत्त्वाच्या पोटनिवडणुकीपूर्वी शुक्रवारी मुलतान शहरात पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पक्षाच्या रॅलीचे नेतृत्व करताना मरियम नवाजने याबाबत भाष्य केले.

आपल्या या राजकीय भूमिकेविषयी बोलताना मरियम म्हणाली, "दोन मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांमधील लढा माझ्या हिताचा नाही, पीटीआयशी लढायचे नाही. मला पाकिस्तानची प्रगती करायची आहे आणि त्यासाठी मला पीटीआयच्या तरुणांना आणि त्यांच्या समर्थकांसाठी मैत्री, शांतता आणि प्रेमाचा हात पुढे करायचा आहे. मी इम्रान खान यांनाही देशाला पुढे जाऊ द्या, असे सांगणार आहे.”

MARYAM Nawaz and Imran khan
राजीनामा देऊनही लंकेची सेवा करणार... गोटाबाया राजपक्षे

नवाज आणि मरियम तुरूंगात होती

मरियम म्हणाली की, ती कोट लखपत तुरुंगातील कोठडीतील तिचे फोटो शेअर करू शकते, जिथे 2018 च्या निवडणुकीपूर्वी तिच्या वडिलांसोबत लंडनहून आल्यानंतर तिला कैद करण्यात आले होते. मला इम्रान खानला सांगायचे आहे की जेलमध्ये डेथ सेल काय होते. तुम्हाला कोट लखपत कारागृहातील डेथ सेल पाहण्याची गरज आहे, जिथे तुम्ही मला अनेक महिने ठेवले होते, जिथे बाथरूमच्या मध्ये एकही भिंत नव्हती? मी तुम्हाला ते फोटो पाठवायला हवे का असा प्रश्नही तिने उपस्थित केला होता.

नवाज यांच्या मुलाची खुर्ची धोक्यात..

पंजाबमधील 20 प्रांतीय विधानसभेच्या जागांवर रविवारी पोटनिवडणूक होणार आहे. इम्रानच्या पक्षाने 12 ते 13 जागा जिंकल्या तर पंजाबचे मुख्यमंत्री हमजा शाहबाज यांना सभागृहातील बहुमतातून बाहेर काढता येईल. हमजा शरीफ हा नवाझ शरीफ यांचा मुलगा आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच 22 जुलै रोजी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची फेरनिवड जाहीर केली आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) पंजाबचे मुख्यमंत्री निवडताना मुख्यमंत्री हमजा शाहबाज यांना त्यांच्या पक्षाविरुद्ध मतदान करणाऱ्या 25 असंतुष्ट पीटीआय सदस्यांना पदच्युत केले होते.

MARYAM Nawaz and Imran khan
Mexicoमध्ये नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळले, अपघातात 14 जण ठार

पीएमएल-एन पंजाब पोटनिवडणुकीत हेराफेरी करण्याचा प्रयत्न करेल: इम्रान खान

दुसरीकडे, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांनी पंजाब पोटनिवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आणि समर्थकांना मतदान केंद्रांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज निवडणुकीत हेराफेरी करण्याचा प्रयत्न करेल, असा दावा केला. जाहीर सभेदरम्यान, माजी पंतप्रधान म्हणाले, "पीएमएल-एन निवडणुकीत धाड टाकण्याच्या तयारीत आहे, कारण पक्षाला माहित आहे की पीटीआय सर्व मतदारसंघात क्लीन स्वीप करेल."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com