पंतप्रधान इम्रान खान यांचा विरोधकांवर 'दुसरा'; 90 दिवसांत घ्यावी लागणार निवडणूक

पंतप्रधानांच्या शिफारशीनंतर संसद विसर्जित? 90 दिवसांनी निवडणूक घेण्याची तयारी
Imran Khan News
Imran Khan NewsDainik Gomantak
Published on
Updated on

लाहोर : पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत आज मोठ्या नाड्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव नॅशनल असेंबलीचे डेप्युटी स्पीकर कासिम खान सूरी यांनी फेटाळून लावला आहे. त्यांनी हा ठराव पाकिस्तानच्या राज्यघटनेच्या कलम 5 अन्वये असंवैधानिक ठरवून फेटाळला. यानंतर लगेचच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित करताना नॅशनल असेंबली बरखास्त करण्याचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला असल्याचे सांगितले. मात्र, 30 मिनिटांत राष्ट्रपतींनी संसद विसर्जित करण्यास मंजुरी दिली. आता या मंजुरीनंतर 90 दिवसांत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात विरोधक सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. (Pakistan PM Imran Khan advises President to dissolve National Assembly)

इम्रान (PM Imran Khan) यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अविश्वास ठरावावर मतदान न घेण्याच्या उपसभापतींच्या निर्णयाचे समर्थन केले. ते म्हणाले की, आम्हाला घाबरण्याची गरज नाही, अल्लाह या समुदायावर लक्ष ठेवून आहे. रमजानच्या दिवशी पाकिस्तान (Pakistan) अस्तित्वात आला. आज सभापतींनी आपल्या अधिकाराचा वापर करून घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. आम्ही डेमोक्रॅट्सकडे जाऊ. लोक ठरवतील त्यांना कोण हवे आहे. अशा भ्रष्ट लोकांना माझे आवाहन आहे की, बाहेरून येणार्‍या पैशाच्या पोत्याने देशाचे भवितव्य ठरवू नका. ज्यांनी हे पैसे घेतले आहेत ते चांगल्या कामात लावा.

तसेच इम्रान पुढे म्हणाले की, मी माझ्या समाजाला सांगतो की त्यांनी निवडणुकीची तयारी करावी. देशाचे भवितव्य काय असेल हे परदेशात ठरवायचे नसते. मी अध्यक्षांना सल्ला दिला आहे. त्यानूसार विधानसभा (Assembly) विसर्जित होईल. त्यामुळे मुळे देशातील जनतेने आता निवडणुकीची तयारी करावी, असं आवाहन इम्रान खान यांनी केलं.

मंत्री फवाद हुसेन यांनी संसदेत विरोधकांवर हल्लाबोल

नॅशनल असेंबलीमध्ये फवाद हुसेन यांनी विरोधकांवर हल्लाबोल करताना म्हटले की, अविश्वास प्रस्ताव हा सामान्यतः लोकशाही (Democracy) अधिकार आहे. घटनेच्या कलम 95 अन्वये अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे, परंतु दुर्दैवाने सत्ता बदलण्याचे हे परकीय सरकारचे षडयंत्र आहे. फवादच्या भाषणाच्या शेवटी उपसभापतींनी अविश्वास ठराव फेटाळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com