पाकिस्तानला लवकरच मिळणार आंनदाची बातमी, FATF च्या 'ग्रे' लिस्टमधून होणार मुक्त

पाकिस्तान फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) ग्रे लिस्टमधून बाहेर पडू शकतो, असे वृत्त समोर येत आहे.
Shehbaz Sharif
Shehbaz SharifDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानला लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. पाकिस्तान फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) ग्रे लिस्टमधून बाहेर पडू शकतो, असे वृत्त समोर येत आहे. 14 ते 17 जून दरम्यान जर्मनीमध्ये FATF ची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान जून 2018 पासून ग्रे लिस्टमध्ये आहे. ग्रे लिस्टमध्ये राहिल्यामुळे पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. (Pakistan may be removed from the Financial Action Task Force's gray list)

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानला FATF च्या ग्रे लिस्टमधून काढून टाकले जाऊ शकते. या आठवड्यात बर्लिनमध्ये (Berlin) होणाऱ्या FATF बैठकीत ही घोषणा केली जाऊ शकते. अटींचे पालन करण्याबाबत माहिती गोळा करण्यासाठी FATF टीम पाकिस्तानला भेट देईल. ऑक्टोबरमध्ये FATF कडून अधिकृत घोषणा केली जाईल.

Shehbaz Sharif
पैगंबर विवाद: भारताविरोधात पाकिस्तान चालवतोय सोशल मीडियावर 'नापाक' मोहिम

दरम्यान, 2018 च्या कृती आराखड्यात समाविष्ट असलेल्या 27 पैकी पाकिस्तानने 26 अटी पूर्ण केल्या आहेत, असे सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. त्याच वेळी, FATF च्या एशिया पॅसिफिक ग्रुप (APG) 2021 कृती योजनेच्या 7 पैकी 6 अटी पूर्ण केल्या आहेत.

Shehbaz Sharif
जगभरात गुन्हेगारीत पाकिस्तान 'आघाडीवर'

दुसरीकडे, जून 2018 मध्ये कृती आराखड्यात समाविष्ट अटी पूर्ण होईपर्यंत पाकिस्तान (Pakistan) ग्रे लिस्टमध्ये राहील, असे FATF चेअरमन म्हणाले होते. मात्र, आर्थिक दहशतवादाचा (Terrorism) प्रश्न अद्याप सुटलेला नाही, असेही सभापती म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com