Tuition Center Roof Collapse: अभ्यास करत असतानाच काळाचा घाला! ट्यूशन सेंटरचे छत कोसळून 14 शाळकरी मुलांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली दबले अनेक जीव VIDEO

Lahore Tuition Center Roof Collapse Accident: पाकिस्तानातील लाहोर शहरातून एक अत्यंत वेदनादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली.
Lahore Tuition Center Roof Collapse Accident
Tuition Center Roof CollapseDainik Gomantak
Published on
Updated on

Lahore Tuition Center Roof Collapse Accident: पाकिस्तानातील लाहोर शहरातून एक अत्यंत वेदनादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली. लाहोरमधील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये चालवल्या जाणाऱ्या खाजगी ट्यूशन सेंटरचे छत अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 14 शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाला असून 5 गंभीर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मंगळवारी (30 जून) लाहोरच्या काहना भागातील ईदगाह वस्तीमध्ये ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. ज्यावेळी हे छत कोसळले, त्यावेळी 7 ते 13 वर्षे वयोगटातील निष्पाप मुले वर्गात बसून शिक्षण घेत होती. अचानक छत कोसळल्याने ही मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली.

Lahore Tuition Center Roof Collapse Accident
Pakistan Attack: सीमाभाग रक्ताने माखला! पाकड्यांचा अफगाणिस्तानवर मोठा हल्ला, 29 बंडखोरांचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि मदत पथकांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु केले. शर्थीचे प्रयत्न करुन ढिगाऱ्याखालून एकूण 20 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींमध्ये मुलांसोबतच एका महिला शिक्षिकेचाही समावेश आहे. लाहोरच्या (Lahore) कमिशनर मरियम खान यांनी 14 मुलांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरु असल्याचे सांगितले. ही इमारत अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या निवासी भागात बेकायदेशीरपणे उभारली जात होती, असा प्राथमिक अंदाज आहे.

Lahore Tuition Center Roof Collapse Accident
Pakistan Statement Controversy: "पाकिस्तान आम्हाला प्रिय'', अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यावर रिपब्लिकन सिनेटर्सचा हल्लाबोल, म्हणाले, 'आधी तुमचे खरे मित्र ओळखा!'

लाहोरचे डीआयजी ऑपरेशन्स फैसल कामरान यांनी सांगितले की, ढिगाऱ्यातून आतापर्यंत 14 निष्पाप मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ट्यूशन सेंटर ज्या इमारतीत सुरु होते, तिच्या एका भागाचे बांधकाम अद्याप सुरुच होते. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी हे छत कोसळले, त्यावेळी वरच्या मजल्यावर मजूर काम करत होते. मजुरांच्या कामाच्या दबावामुळे किंवा निकृष्ट बांधकामामुळे हे छत कोसळल्याची शक्यता आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत इमारतीचा कंत्राटदार आणि आणखी एका व्यक्तीसह एकूण दोघांना ताब्यात घेतले. पोलीस घटनास्थळावरुन पुरावे गोळा करत आहेत.

Lahore Tuition Center Roof Collapse Accident
Pakistan Bus Accident: एक्सप्रेसवेवर काळाचा थरार, दोन बसेसची जोरदार धडक! पाकिस्तानात भीषण अपघात; 17 प्रवाशांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

या भीषण अपघातावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात, शरीफ यांनी निष्पाप मुलांचे प्राण गेल्याबद्दल सहवेदना व्यक्त केल्या असून जखमींना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय मदत देण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला कडक निर्देश दिले असून, या निष्काळजीपणाला कारणीभूत असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण लाहोर शहरावर शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com