Pakistan : महिला पत्रकाराच्या मृत्यूनंतर इम्रान खान यांनी थांबवला 'लाँग मार्च'; म्हणाले...

Pakistan Imran Khan Latest News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हक्की आझादी मार्चदरम्यान रविवारी (30 ऑक्टोबर) एका महिला पत्रकाराची हत्या झाली.
Pakistan Imran Khan cancels long march after death of women reporter
Pakistan Imran Khan cancels long march after death of women reporterDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Imran Khan Latest News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या आझादी मार्चदरम्यान रविवारी (30 ऑक्टोबर) एका महिला पत्रकाराची हत्या झाली. त्यानंतर दिवसभरासाठी मोर्चा थांबवण्यात आला. कंटेनरखाली येऊन महिला पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. 'चॅनल 5'ची रिपोर्टर सदफ नईम असे मृत पत्रकाराचे नाव आहे.

इम्रान खान यांनी ट्विट केले की, "आज आमच्या मोर्चादरम्यान झालेल्या अपघातात चॅनल 5 ची रिपोर्टर सदफ नईम हिच्या मृत्यूने धक्का बसला आहे आणि खूप दु:ख झाले आहे. माझे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. या दुःखाच्या वेळी मी माझी प्रार्थना आणि संवेदना व्यक्त करतो. मी कुटुंबासोबत आहे. आम्ही आजचा मोर्चा रद्द केला आहे." माहितीनुसार, इम्रान खान ज्या कंटेनरमध्ये प्रवास करत होते त्या कंटेनरने सदफला चिरडले आहे, मात्र याला दुजोरा मिळालेला नाही.

(Pakistan Imran Khan cancels long march after death of women reporter)

Pakistan Imran Khan cancels long march after death of women reporter
Goa Petrol-Diesel Price : जाणून घ्या गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

पंतप्रधानांनीही शोक व्यक्त केला

त्याचवेळी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही पत्रकाराच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, सदफ नईम ही खूप जिंदादिल आणि मेहनती रिपोर्टर होती. तिच्या आत्म्यासाठी आणि शोकाकूल कुटुंबासाठी प्रार्थना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रॅलीत मोठ्या संख्येने लोक पोहोचले

माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये हजारो पाकिस्तानी ‘लाँग मार्च’मध्ये सहभागी होत असल्याचे दिसले. त्यांनी ट्विट केले की, "ही ती क्रांती आहे ज्याबद्दल मी बोलत होतो. आमच्या आझादी मार्चच्या तिसऱ्या दिवशी आणि जसजसे आम्ही पुढे जात आहोत, लोक मोठ्या संख्येने आमच्या मोर्चात सामील होत आहेत." दरम्यान, आपला पक्ष पाकिस्तानी लष्करासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर साधला निशाणा

पीटीआय प्रमुख पीएम शाहबाज यांच्या एका दिवसापूर्वी दिलेल्या विधानाचा संदर्भ देत होते. ज्यामध्ये त्यांनी दावा केला होता की त्यांनी लष्करप्रमुखाच्या नियुक्तीबाबत इम्रानचा प्रस्ताव नाकारला होता आणि त्याऐवजी त्यांना लोकशाहीची सनद आणि अर्थव्यवस्थेच्या चार्टरवर बोलण्याची ऑफर दिली होती. शाहबाज यांना उत्तर देताना इम्रान यांनी पुढे प्रश्न केला की, तुमच्याशी बोलून काय फायदा? तुला कशाबद्दल बोलायचे आहे?"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com