काल झालेल्या दुबईच्या मैदानावर भारताविरुद्धच्या T-20 विश्वचषकात पाकिस्तानच्या (Pakistan)विजयानंतर पाकिस्तानी नागरिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. विश्वचषकाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, यात पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध विजय मिळवला आहे (INDvsPak).अशातच आता पाकिस्तानी नेत्यांची काही वादग्रस्त विधाने समोर येत आहेत.
पाकिस्तानचे गृहमंत्री (Pakistan Home Minister ) शेख रशीद (Sheikh Rasheed Ahmad) यांनी या विजयाबद्दल धक्कदायक आणि तितकेच चिडजणक विधान केले आहे.त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा पाकिस्तानी गृहमंत्र्यांची मानसिकता समोर आली आहे. ' पाकिस्तानचा विजय इस्लामचा विजय असल्याचे सांगितले आहे.' (Pakistan Home Minister Sheikh Rasheed Ahmad controversial statement on India Pakistan match)
या विजयांनंतर शेख रशीद म्हणाले की , भारतीय मुस्लिमांसह जगातील सर्व मुस्लिम, पाकिस्तानने पहिल्यांदाच टी -20 सामना दहा विकेटने जिंकल्यानंतर आनंद साजरा करत आहेत. पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी पुन्हा एकदा धर्माबाबत भाष्य केले आहे . त्यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाचा विजय हा अलमी इस्लामचा विजय असल्याचे म्हटले आहे. मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांच्या चमकदार कामगिरीनंतर त्यांचे हे वक्तव्य आले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला आहे.
त्याचबरोबर त्यांनी 'मला दुःख होत आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा पहिला सामना आहे, जो मी माझ्या राष्ट्रीय जबाबदाऱ्यांमुळे मैदानावर पाहू शकलो नाही. पण मी इस्लामाबाद, रावळपिंडीकडे जाणाऱ्या सर्व ट्रॅफिकला रस्त्यावर ठेवलेले कंटेनर हटवण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून लोकांना हा विजय उत्साहात साजरा करता येईल. ते म्हणाले, पाकिस्तानच्या संघाचे आणि पाकिस्तानच्या जनतेचे अभिनंदन.'आज आमची फायनल होती आणि जगभरातील मुस्लिमांसह भारतातील मुस्लिमांच्या भावना पाकिस्तानी संघासोबत होत्या. सर्वांना इस्लामच्या हार्दिक शुभेच्छा.असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा धर्मांध गरळ ओकली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.