पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा अडचणीत वाढ

पंतप्रधान इम्रान यांना मिळालेल्या भेटवस्तू देशाच्या तिजोरीत पोहोचत नसल्याच्या अनेक दिवसांपासून तक्रारी येत असल्याची माहिती आहे.
Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानचे पंतप्रधानपद गमावलेल्या इम्रान खान यांचा अडचणीत वाढ झाली आहे. इम्रान खान आणि बुशरा बीवी यांना मिळालेल्या 329 भेटवस्तूंची यादी समोर आली आहे. त्यांना मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंमध्ये (Gifts) सात रोलेक्स घड्याळे, महागडे पेन, सोन्याचे कफलिंक, सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने, अंगठ्या, सोन्याने बनवलेली एके-47 आणि अनेक महागड्या भेटवस्तूंचा समावेश आहे.

Imran Khan
जोडप्यांच एकमेकांवर अफाट प्रेम; 'हा' जगातील रोमँटिक देश

वास्तविक पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या, मात्र त्यांनी त्या विकल्या. इम्रान सत्तेत असतानाही हे प्रकरण चर्चेत आले होते. मात्र त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात या प्रकरणाची चौकशी होऊ शकली नाही. आता पाकिस्तानची सर्वात मोठी तपास संस्था फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) इम्रान खान पंतप्रधान असताना त्यांना परदेशातून मिळालेल्या भेटवस्तूंचा शोध घेत आहे. या सगळ्याची किंमत खूप जास्त होती. इम्रान आणि त्याची पत्नी बुशरा बीबी यांच्यावर गिफ्ट विकल्याचा आरोप आहे.

पंतप्रधान इम्रान (Imran Khan) यांना मिळालेल्या भेटवस्तू देशाच्या तिजोरीत पोहोचत नसल्याच्या अनेक दिवसांपासून तक्रारी येत असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत एफआयएने त्यांचा शोध सुरू केला. या वादात बुशरा बीबीचाही त्रास वाढणार आहे. कारण त्याच्यावर ज्वेलरी शोरूममध्ये दागिने विकण्यासाठी दिल्याचा आरोप आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com