Pakistan Earthquake: आधीच समस्येच्या गर्तेत गेलेल्या पाकिस्तानात भूकंप; 4.1 रिश्टरस्केलने हादरला देश

Pakistan Earthquake: पाकिस्तानची जमीन पुन्हा एकदा भूकंपाच्या जोरदार धक्क्याने हादरली आहे.
Pakistan Earthquake
Pakistan EarthquakeDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Earthquake: पाकिस्तान आधीच आर्थिक समस्यांना तोंड देत आहे. अशातच पाकिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरला आहे. इस्लामाबाद आणि पंजाबच्या इतर भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटर (NSMC) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान जवळ होता. त्याची खोली 150 किमी होती आणि रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रता होती.

एनएसएमसीच्या म्हणण्यानुसार, रावळपिंडी, मुरी, खैबर पख्तुनख्वा आणि पंजाबमधील इतर अनेक भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पाकिस्तानमध्ये या महिन्यातील हा तिसरा भूकंप आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे पृथ्वी हादरली. यादरम्यान रिश्टर स्केलवर 5.8 तीव्रता मोजण्यात आली. एनएसएमसीच्या म्हणण्यानुसार या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. त्याच वेळी, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदूकुश भागात होता आणि त्याची खोली 173 किमी होती. माहिती देताना NSMC ने सांगितले होते की, गिलगिट, पाकपट्टन, लकी मारवत, नौशेरा, स्वातसह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. 

पाकिस्तानातील पेशावर, चित्राल, खैबर जिल्हा, टाकी, बाजौर, मर्दान, मुरी, मानसेरा, मुलतान, कोटली येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे धक्के केवळ पाकिस्तानमध्येच जाणवले नाहीत, तर भारतासह इतर शेजारी राष्ट्रांमध्येही भूकंप झाला.

 एनएसएमसीच्या मते, पाकिस्तानमध्ये भूकंप ही एक सामान्य गोष्ट आहे. या भूकंपाच्या एक दिवस आधी पंजाबच्या काही भागात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्याच वेळी, पाकिस्तानमध्ये 2005 साली सर्वात धोकादायक भूकंप आला होता. या भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com