VIDEO: अरेरे! रेड कार्पेटवर पाकिस्तानी उपपंतप्रधान तोंडावर पडले, सुरक्षारक्षकांनी कसंबसं सावरलं; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Pakistan Deputy PM Ishaq Dar Fall Video: नुकताच पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेमुळे पाकिस्तानची जागतिक स्तरावर पुन्हा एकदा मोठी नाचक्की झाली.
Pakistan Deputy PM Ishaq Dar Fall Video
Pakistan Deputy PM Ishaq DarDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Deputy PM Ishaq Dar Fall Video: भारताचा शेजारी देश असलेला पाकिस्तान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो, मात्र अनेकदा ही चर्चा त्यांच्या प्रगतीपेक्षा त्यांच्या फजितीमुळेच जास्त होताना दिसते. नुकतेच पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेमुळे पाकड्यांची जागतिक स्तरावर पुन्हा एकदा मोठी नाचक्की झाली. इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे सरसावले असताना इशाक डार अचानक तोल जाऊन रेड कार्पेटवर तोंडावर पडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी पाकिस्तानची चांगलीच फिरकी घेतली.

ही घटना रविवारी (29 मार्च) इस्लामाबाद येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर घडली. इजिप्तचे परराष्ट्र मंत्री बदर अब्देलत्ती हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचे अधिकृत स्वागत करण्यासाठी इशाक डार रेड कार्पेटवरुन त्यांच्या दिशेने चालत गेले. मात्र, पाहुण्यांचे अभिवादन करण्यापूर्वीच डार यांचा पाय अडखळला आणि ते तोंडावर जमिनीवर कोसळले. हे पाहून तिथे उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक तातडीने त्यांच्या मदतीला धावले आणि त्यांना आधार देऊन उभे केले.

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे एका गंभीर राजनैतिक दौऱ्याची सुरुवात अत्यंत विचित्र पद्धतीने झाली. सोशल मीडियावर अनेकांनी "पाकिस्तानची (Pakistan) अर्थव्यवस्था जशी कोसळली आहे, तसेच त्यांचे मंत्रीही कोसळत आहेत," अशा शब्दांत टोमणे मारले आहेत.

Pakistan Deputy PM Ishaq Dar Fall Video
Pakistan IMF Bailout Package: भीक मागण्यात पाकिस्तान 'सुपरस्टार'! आता आयएमएफनं वाचवला पाकड्यांचा जीव; 1.2 अब्ज डॉलर्स मंजूर

विशेष म्हणजे, ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा मध्यपूर्वेतील तणाव निवळण्यासाठी पाकिस्तान, तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबिया यांच्यात दोन दिवसीय महत्त्वाची चर्चा सुरु आहे. या चर्चेचा मुख्य उद्देश इराण आणि इस्रायलमधील संभाव्य युद्ध रोखणे हा आहे. मात्र, या शांतता चर्चेत सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे ज्यांच्याभोवती हे युद्ध फिरत आहे, ते अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही प्रमुख देश या प्रक्रियेत प्रत्यक्षरित्या सामील नाहीत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराणचे (Iran) राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्याशी संपर्क साधून राजनैतिक हालचाली वेगवान केल्या आहेत.

Pakistan Deputy PM Ishaq Dar Fall Video
Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानच्या एअरस्ट्राईकनंतर अफगाणिस्तानचा पलटवार; 55 पाक सैनिक ठार, 19 चौक्यांवर तालिबानचा ताबा VIDEO

प्रादेशिक शांततेसाठी पाकिस्तान प्रयत्न करत असला तरी उपपंतप्रधानांच्या या 'घसरगुंडी'ने चर्चेपेक्षा त्यांच्या फजितीचीच जास्त चर्चा होत आहे. अमेरिका आणि इराणमधील कूटनीतीशी संबंधित काही अप्रत्यक्ष मध्यस्थ या प्रक्रियेत सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. एकीकडे गंभीर युद्धावर चर्चा सुरु असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांच्या पडण्याचा व्हिडिओ इंटरनेटवर 'मीम्स'चा विषय ठरला आहे, ज्यामुळे पाकिस्तान सरकारची मोठी कोंडी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com