Pakistan: पाकिस्तानमध्ये भगतसिंग, राजगुरु अन् सुखदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांसाठी सुरक्षेची मागणी

Pakistan: भगतसिंग मेमोरियल फाऊंडेशन पाकिस्तानने लाहोर उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
 Pakistan
Pakistan Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan based Organization demand for security for bhagat singh death anniversary

भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त 23 मार्चला दरवर्षी भारतात विविध कार्यक्रम साजरे केले जातात. महत्वाचे म्हणजे फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमध्येदेखील या तीन हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी 23 मार्चला भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांची 93 वी पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे.

यासाठी 93 व्या पुण्यतिथीनिमित्त पाकिस्तानात पुढील आठवड्यात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी सुरक्षित सुरक्षा व्यवस्थेची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. भगतसिंग मेमोरियल फाऊंडेशन पाकिस्तानने लाहोर उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

23 मार्च रोजी येथील शादमान चौकात होणाऱ्या कार्यक्रमासाठी पूर्ण सुरक्षा व्यवस्था पुरवावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कार्यक्रमस्थळी सुरक्षा गेट बसवावेत, असे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी कोर्टात सुनावणी होऊ शकते.

भगतसिंग मेमोरियल फाऊंडेशनचे वकील इम्तियाज रशीद कुरेशी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, पंजाब( Punjab ) सरकारने शादमान चौकात होणाऱ्या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी केलेल्या विनंतीचा विचार केला नाही. 93 वर्षांपूर्वी याच शादमान चौकात भगतसिंग यांना त्यांच्या दोन साथीदारांसह फाशी देण्यात आली होती.

कुरेशी यांनी भगतसिंग यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मिळालेल्या धमक्यांबाबतही न्यायालया( Court )ला माहिती दिली आहे. भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना 23 मार्चला 1931 साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवशी त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा ‘शहीद दिन’ म्हणून मानला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com