पाकिस्तानी लष्कराच्या तळावर आत्मघाती स्फोट अन् गोळीबाराचा थरार! 15 सैनिकांचा मृत्यू; 'टीटीपी'नं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

TTP Terror Attack Pakistan: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या तळाला लक्ष्य करत एक मोठा आणि सुनियोजित आत्मघाती हल्ला घडवून आणला.
Pakistan Army Camp Attack
TTP Terror Attack PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Army Camp Attack: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या तळाला लक्ष्य करत एक मोठा आणि सुनियोजित आत्मघाती हल्ला घडवून आणला. या भीषण हल्ल्यात 15 सैनिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, मात्र लष्कराकडून अद्याप अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून लष्करी तळावर झालेल्या या हल्ल्याने पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

हल्ल्याची भीषणता आणि घटनाक्रम

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सुरुवातीला लष्करी तळाच्या एका महत्त्वाच्या भागात जोरदार स्फोट घडवून आणला. या स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, संपूर्ण तळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याच परिस्थितीचा फायदा घेत अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले दहशतवादी तळाच्या आत घुसले. त्यानंतर सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये बराच वेळ चकमक सुरु होती. दहशतवाद्यांनी हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केला असून त्यात मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा वापर करण्यात आला.

Pakistan Army Camp Attack
Terrorist Attack in Pakistan: हल्लेखोर दुचाकीवरून आला अन् थेट... पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला; 18 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबाबदारी

या भीषण हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील (Pakistan) प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) ने स्वीकारली आहे. त्यांच्या 'स्पेशल इस्तशहादी फोर्स'ने ही कारवाई केल्याचा दावा संघटनेने केला. खैबर पख्तूनख्वा आणि आसपासच्या भागात गेल्या काही दिवसांपासून टीटीपीच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली असून लष्करी आस्थापनांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे.

Pakistan Army Camp Attack
Pakistan Suicide Attack: पाकिस्तानात आत्मघातकी हल्ला! सुसाईड बॉम्बरनं स्वतःला उडवलं; 31 ठार, अनेक जखमी VIDEO

एका आठवड्यात दुसरा मोठा हल्ला

विशेष म्हणजे, खैबर पख्तूनख्वा प्रांतात एकाच आठवड्यात झालेला हा दुसरा मोठा आत्मघाती हल्ला आहे. यापूर्वी लक्की मरवत जिल्ह्यातील नौरंग बाजार परिसरात एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेला ऑटोरिक्षा उडवून दिला होता. त्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एका महिलेचा मृत्यू झाला होता. सातत्याने होणाऱ्या या हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले.

Pakistan Army Camp Attack
Pakistan Terrorist Attack: पाकिस्तान पुन्हा हादरला! बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 9 पाकिस्तानी सैनिक ठार

सर्च ऑपरेशन आणि सुरक्षा कडक

हल्ल्यानंतर स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण बाजौर परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा (Terrorists) शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. सीमावर्ती भागात आणि संवेदनशील ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. लष्करी तळावरील झालेल्या या नुकसानीचा आढावा घेतला जात असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खैबर पख्तूनख्वामधील बिघडलेली सुरक्षा परिस्थिती पाहता पाकिस्तान सरकार आता काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com