मोहन भागवतांचं 'फाळणी'वर विधान, पाकिस्तानला मिर्ची

"आरएसएस प्रमुखांनी अशा प्रकारची भ्रामक विचारसरणी आणि ऐतिहासिक सुधारणावाद असलेले वक्तव्य जाहीरपणे करण्याची ही पहिलीच वेळ नाही."- पाकिस्तान
Pakistan angry on RSS chief Mohan Bhagwat Partition statement
Pakistan angry on RSS chief Mohan Bhagwat Partition statement Dainik Gomantak
Published on
Updated on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी गुरुवारी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात देशाच्या फाळणीवर(Partition of India) मोठे विधान केले होते . देशाची फाळणी ही अविनाशी वेदना असून फाळणी रद्द झाल्यावर ही वेदना दूर होईल, असे ते म्हणाले. त्याचवेळी आता आरएसएस प्रमुख भागवत यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानकडून (Pakistan) एक प्रतिक्रिया आली आहे. शेजारील देशाने भागवत यांचे वक्तव्य फेटाळून लावले आहे. मोहन भागवत यांचे वक्तव्य पाकिस्तानने प्रक्षोभक आणि बेजबाबदार असल्याचे देखील म्हटले आहे.(Pakistan angry on RSS chief Mohan Bhagwat Partition statement)

मोहन भगवंतांच्या या विधानानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "आरएसएस प्रमुखांनी अशा प्रकारची भ्रामक विचारसरणी आणि ऐतिहासिक सुधारणावाद असलेले वक्तव्य जाहीरपणे करण्याची ही पहिलीच वेळ नाही." त्याचबरोबर "पाकिस्तानने अतिरेकी 'हिंदुत्व' विचारधारा आणि विस्तारवादी परराष्ट्र धोरण यांच्या मिश्रणामुळे प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेला निर्माण झालेला धोका वारंवार अधोरेखित केला आहे. हे धोरण भारतातील सत्ताधारी आरएसएस-भाजप सरकार स्वीकारत आहे. या मानसिकतेचा उद्देश भारतातील अल्पसंख्याकांना पूर्णपणे दुर्लक्षित करणे आहे," असे परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या फाळणीच्या दुखावरचा उपाय म्हणजे फाळणी रद्द करणे हा असून देशाची पुन्हा फाळणी होणार नाही, असेही ते म्हणाले. 'विटनेस ऑफ द पार्टीशन ऑफ इंडिया' या पुस्तकाचे विमोचन करताना भागवत म्हणाले की, भारताच्या पारंपारिक विचारसरणीचे सार हे सर्वांना बरोबर घेऊन चालणे आहे, स्वतःला योग्य आणि इतरांना चुकीचे समजणे नाही. याउलट इस्लामी आक्रमकांची विचारसरणी अशी होती की ते स्वतःला योग्य आणि इतरांना चुकीचे समजतात, असे भागवत म्हणाले.पूर्वी संघर्षाचे हेच मुख्य कारण होते. इंग्रजांची हीच विचारसरणी होती, त्यांनी 1857 च्या उठावानंतर हिंदू-मुस्लिमांमध्ये दुरावा वाढवला.अशी खदखद ही मोहन भागवत यांनी बोलून दाखवली आहे.

Pakistan angry on RSS chief Mohan Bhagwat Partition statement
'नेपाळमध्ये सत्तेत आल्यास भारताकडून कालापानी, लिम्पियाधुरा, लिपुलेख परत घेणार': ओली

'पण हा 1947 चा भारत नसून 2021 चा भारत आहे. फाळणी एकदा झाली, पुन्हा होणार नाही. जे आता असा विचार करतात ते स्वतःच फसतील होतील.आरएसएसने जारी केलेल्या निवेदनानुसार भागवत म्हणाले, 'भारताच्या फाळणीच्या वेदनांवर उपाय म्हणजे फाळणी रद्द करणे.'असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com